दोन कोटींच्या उद्यान प्रकल्पामुळे शाहूपुरीच्या वैभवात भर

आ. शिवेंद्रसिंहराजे; बहुउद्देशीय उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजनउत्साहात

सातारा- शाहूपुरीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला असून येथील अनेक समस्या सोडवल्या आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच सुविधेसाठी शाहूपुरीत सुसज्ज बहुउद्देशीय उद्यान निर्माण केले जाणार असून या प्रकल्पामुळे शाहूपुरीच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नातून आणि राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये निधीतून शाहूपुरीसाठी मंजूर झालेल्या बहुउद्देशीय उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अविनाश कदम, माजी सरपंच भारत भोसले, अक्षय जाधव, सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, सौ.शोभाताई केंडे, अजित कदम, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र इंगवले, गणपतराव साळुंखे, राज मांजगांवकर, शालगरसो, निलेश धनावडे, बाळासाहेब निकम, विकास देशमुख, सतीश सुर्यवंशी, नितीन तरडे, तुषार जोशी, रमेश इंदलकर, राजेंद्र केंडे, चंद्रकांत निमकर, डॉ.चेतना मांजगांवकर, श्रीरंग जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या प्रकल्पांतर्गत लहान मुलांपासून महिला व जेष्ठ नागरिकांना उपयोगी पडणा-या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून भविष्यात येथे स्विमिंग टँकची निर्मिती होण्यासाठी आमचा विशेष आग्रह राहणार आहे. येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असणारी १०० झाडांची वनसंपदा जपण्यासाठी सुध्दा प्रशासन पातळीवर सूचना दिल्या जातील. तसेच, या प्रकल्पाचे काम सुध्दा अतिशय चोख व दर्जेदार होईल याबाबत आपण सर्वांनी दक्षता घेऊया. भैरोबा पायथा परिसरात ५० लाख निधीतून एका बॅडमिंटन हॉलची निर्मिती सुध्दा लवकरच करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या सध्याच्या चुकीच्या राजकारणाला शाहूपुरीवासियांनी वेळीच ओळखून भूलथापांना बळी पडू नये. घरपट्टीच्या ज्वलंत प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले असून अपील कमिटीत सुनावणी दरम्यान एकही  लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेस योग्य न्याय शासकिय प्रतिनिधी देऊ शकणार नाहीत. सबब निवडणुकीनंतर ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत अशी मागणी केली असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.भारत भोसले यांनी प्रास्ताविक केले. युवा नेते अक्षय जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.लताताई जाधव, हणमंतराव पालेकर, सुरेश शेटे, अमर जाधव, सुरेश शिंगटे, विश्वतेज बालगुडे,अनिकेत जगताप, दीपक अवकीरे, दत्तात्रय जाधव, महेंद्र गायकवाड, महेश जांभळे, बकरे, तात्या चोरगे, मारुती कदम, सौरभ पाटणे, चैतन्य गायकवाड, सतीश इंदलकर, शंतनु जाधव, युवा सहकारी, महिला व जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


 
 
 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त