मोक्क्याच्या गुन्ह्यातील पाच वर्षापासून फरारी असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडून जेरबंद
Satara News Team
- Fri 14th Oct 2022 09:43 am
- बातमी शेयर करा
सातारा : मोक्याच्या गुन्ह्यातील पाच वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीला सातारा गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे आरोपीचे नाव राहुल विष्णु शिंदे (राहणार मल्हार पेठ सातारा) असे आहे पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी मयुरेश तानवडे यांनी व्याजाने घेतलेल्या रकमेच्या व्याजाची रक्कम वसूल करण्याकरता मुख्य आरोपी महेंद्र तपासे व त्याच्या सहा साथीदारांनी फिर्यादी मयुरेश तानवडे यांच्या कुटुंबीयांना धमकावून मारहाण करत इनोव्हा कार व कार मधील 15000 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान यावेळी मुख्य आरोपी महेंद्र तपासे यास पोलिसांनी अटक केली होती परंतु त्याचे सहा साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होते दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलिसांनी तपासे व त्याच्या सहा साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती दरम्यान काल सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील फरार आरोपी राहुल विष्णु शिंदे हा सातारा शहरातील ग्रीन सिटी अपार्टमेंट येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सापळा लावून फरारी आरोपी राहुल विष्णु शिंदे या ताब्यात घेतले आहे.व त्याला पुढील कार्यवाहीसाठी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर रमेश गरजे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पोलिसांना संतोष सपकाळ ,शरद बेबले ,प्रवीण फडतरे ,लक्ष्मण जगधने ,गणेश कापरे ,निलेश काटकर ,मुनीर मुल्ला ,विशाल पवार ,मोहन पवार, रोहित निकम सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव यांनी सदरची कारवाई केली
#satarapolice
#crim
#Crimekatarkhatsv
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 14th Oct 2022 09:43 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 14th Oct 2022 09:43 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 14th Oct 2022 09:43 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 14th Oct 2022 09:43 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 14th Oct 2022 09:43 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 14th Oct 2022 09:43 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 14th Oct 2022 09:43 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 14th Oct 2022 09:43 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 14th Oct 2022 09:43 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 14th Oct 2022 09:43 am
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 14th Oct 2022 09:43 am
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 14th Oct 2022 09:43 am
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 14th Oct 2022 09:43 am













