शेअर मार्केटिंग साठी तालुक्यात एजंटाचा सुळसुळाट

वर्षात डबल करून देणारे आज मात्र गायब

फलटण:सध्या कमी श्रमात जास्त पैसे मिळवून देणाऱ्या कंपन्यांनी फलटण तालुक्यात प्रचंड पैसा गोळा केला.यासाठी या कंपन्यांचे एजंट फलटण तालुक्यातील अनेक गावात रात्रंदिवस काम करीत आहेत. पैसे डबल करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना या लोकांमार्फत गावा गावात पोहचवल्या जात आहेत. यावसाठी फलटण मधील मोठ्या आलिशान हॉटेलात व कार्यालयात मिटिंग सुद्धा होतात .गावात मळक्या कपड्यात फिरणारा एजंट आशा मिटिंग मध्ये मात्र सुटा बुटात उपस्थितांना आकर्षित करत आहे.

एकंदरीतच फलटण तालुक्यात कोट्यावधी ची माया गोळा करणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून
काही सामाजिक काम करणारे व शहरातील प्रतिष्ठित लोकही या कंपनीच्याच्या गळाला लागले आहेत. अनेकांना पैसे डबल करण्याचे आम्हीच दाखवल्याने जास्तीत जास्त लोक पैसे गुंतवणूक करीत आहेत.फलटण शहरातील छोटे व्यवसायिक, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यवसायिक दुकानदार यांनी काही शेअर मार्केटिंग तर काहींनी क्रीपटो करन्सी करणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवणूक केले आहेत या पैकी अनेकांना माहितीही नाही आपण गुंतवलेले पैसे कोणाकडे गेले किंवा कोणत्या कंपनीत गेले हे पैसे कोणत्या व्यवसायात मध्ये वापरले जातात हे ही माहिती नाही त्यांना फक्त एकच माहिती असते पैसे डबल होतात आणि बँकेत जमा होतात.

या पैकी एक दोन कंपन्या चा परतावा बंद होऊन महीने उलटले तरी गुंतवणूकदार काहीही बोलत नाही कारण पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास हातात काहीच मिळणार नाही या भीतीने तक्रारही कोणी करत नसल्याचे लक्षात येते आणि सामाजिक प्रतिष्ठा जाईल ते वेगळेच, अशा बोगस कंपनीचे एजंट पुन्हा सक्रिय झाल्याचे व बैठका सुरू झाल्याचे समजते पोलिसही तक्रार नोंदवा म्हणून अनेकांना विनंती करत आहेत परंतु तक्रार नोंदवण्यास कुणीच पुढे येत नाही असा कोणता शेअर आहे ज्यात पैसे गुंतवले की ते वर्षात डबल होतात असा साधा प्रश्न लोक एजंट अथवा कंपनीला विचारत नाहीत या कंपन्यांची कार्यालये नक्की कोठे आहेत हे ही अनेकाना माहीत नाही.

नुकतीच फलटण तालुक्यातील कोट्यावधीचा चा शेअर मार्केटचा घोटाळा प्रकरणी बातमी प्रसिद्ध होताच सातारा जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील एजंट हवालदिल झाले होते सर्व गुंतवणूकदार आपल्या पैशाचं काय अशी एजंट ला विचारत होते, एकंदरीतच चर्चा ही फक्त शेअर मार्केटची रंगली होती. त्यावेळी हे एजंट त्या बातमीचा आपल्या कंपनीचा संबंध नाही अशी  खोटे बोल बोलत होती प्रत्येक जण एजंट पैसे माघारी देण्याची वेळ येईल म्हणून बोलले टाळत होते. पैशासाठी सतत फोनवर फोन येत असल्याने एजंट उघडलेल्या दुकानांना टाळे लागते की काय अशी सांशकता मनात आणत होते.

आता सर्वांशी लक्ष लागले आहे ते शासनाच्या विविध विभागाकडून खास करून ईडी कडून होणाऱ्या चौकशीबाबत सर्वात महत्त्वाचे यावेळी असे आहे की आज अखेर बोगस कंपनीची चौकशी होत होती पण यावेळी चौकशी अधिकारी एजंट व गुंतवणूकदार यांनाही चौकशीतून सोडणार नाहीत अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक काळा पैसा डबल पांढरा करणाऱ्या गुंतवणूकदार यांची यावेळी खैर नाही हे नक्की.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त