धोम जांभळी रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

वाई : वाई तालुक्यातील धोम ते जांभळी जाणाऱ्या रस्त्यावर दि.11 रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला होता. त्या अपघातातील मृत झालेल्या दुचाकी चालक तानाजी नवलू शेलार(रा. खावली) याच्या विरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी असलेल्या दुसरा दुचाकी चालक ज्ञानदेव चंद्रकांत सणस(वय 24, रा. रेणावळे) याच्यावर रुग्णालयात उपबापू वाघचार सुरु आहेत.  
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश अंकुश सणस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 11 रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन ज्ञानदेव सणस हा जांभळी ते वाई जाणाऱया रस्त्यावरुन चालला होता. उंबरवाडी नजिक समोरुन आलेल्या दुचाकीवरुन तानाजी शेलार याने भरधाव वेगात दुचाकी चालवून धडक दिली. त्या अपघातात तानाजीचा मृत्यू झाला तर जखमी झालेल्या ज्ञानदेव याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाळूंज हे करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला