शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची कडुन करंजे परिसरातील तडीपार गुंडासह त्याचे साथिदाराकडुन घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघड

सातारा : तडीपार इसमांना चेक करुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश किंद्रे यांनी पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला हद्दपार इसमांना चेक करुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

दि. 09/04/2023 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना गोपनिय माहिती मिळाली की. शाहुपूरी पोलीस ठाणे अभिलेखावरील चोरी व घरफोडी चोरी करणारा तडीपार इसम विपुल तानाजी नलवडे रा. करंजे, सातारा हा करंजे परिसरातील कॅनॉलजवळ फिरत आहे, अशी माहिती मिळाल्याने शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी तात्काळ करंजे परिसरात नमुद इसमाचा शोध घेत असतना तो करंजे कॅनॉलजवळ बसलेला दिसत त्याचेकडे पोलीस आलेचे दिसतात तो पळून जावु लागला म्हणुन गुन्हे शाखेच्या स्टाफने सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्याचेवर तडीपार कारवाईचा भंग केले बाबतचा गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची असमाधानकारक उत्तरे देवु लागला. म्हणून गुन्हे प्रकटकीरण शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी त्याचेकडे कौशल्यापुर्वक विचारपुस केली असता त्याने प्रथम सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्याचा करंजे, ता. जि. सातारा येथील त्याचा दुसरा साथीदार याचेसह राजवाड परिसरातून अॅक्सेस मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून सदरची मोटार सायकल हि करजे भैरवनाथ पटांगणाजवळ सोडली असल्याची कबुली दिली. त्यानंतर करंजे परिसरातुन त्याचा दुसरा साथिदार यास करजे येथून ताब्यात घेवुन त्या दोघांकडे चोरी व घराफोडी चोरीचे अनुशंगाचे विचारपुस केली असता त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेकडील चारचाकी वाहनाची चोरी करुन सदरचे वाहन बोगदा परिसरात बेवारस स्थितीत सोडल्याची कबुली दिली. तसेच राधिका रोडवरील एक बंद घरफोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. सदर माहितीचे अनुशंगाने गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी अभिलेखाची पडताळणी केली असता त्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं 49/2023 भादविसंक. 379 व गुरनं. 68/2023 भादिवसंक. 457,511 तसेच सातारा शहर पोलीस गुरनं. 297/2023 भादविसंक. 379 प्रमाणे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली असुन, त्यांचेकडुन घरफोडी व चोरीचे एकूण (3 गुन्हे उघडकीस आले आहेत.

अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनिय माहितीचे आधारे तडीपार गुंडास पळुन जात असताना पाठलाग करुन जेरबंद केले व त्याचे साथिदारास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन मोटार सायकल चोरी, चारचाकी वाहन चोरीसह घरफोडी चोरीचे एकुण 03 गुन्हे उघकीस आणुन त्यांना नमुद गुन्हयाचे तपासकामी अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लेलेश फडतरे, सचिन माने, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल पवार, पो. हवा./संतोष इष्टे, तुषार डमकले, प्रविण वायदंडे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त