कोरेगावला मंत्रिपद मिळणार ?
नवीन मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आमदार महेश शिंदे यांची वर्णी लागणार ?Satara News Team
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
- बातमी शेयर करा
दरम्यान, कोरेगाव शहर व तालुक्यातील अनेक विविध सोशल मीडिया माध्यमांवर आमदार महेश शिंदे यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद (राज्यमंत्री दर्जा) मिळणार असल्याचे व्हायरल होऊ लागले आहे.
कोरेगाव : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा समारोप काल महविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सदस्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळात महेश शिंदे यांचा नक्की समावेश होईल, असा कार्यकर्त्यांना व जनतेला विश्वास वाटतो.
महाराष्ट्राच्या संभाव्य नवीन मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आमदार महेश शिंदे यांची वर्णी लागणार, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्ते व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेत दिसून येत आहे.
महेश शिंदे हे मूळचे भाजपचे. त्यांनी पाच ते साडेपाच वर्षांपूर्वी कोरेगाव मतदारसंघात बांधणी करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना चांगले यश मिळाले. मात्र, प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युतीत त्यांना कोरेगाव मतदारसंघ हा सेनेचा असल्याने शिवबंधन बांधून सेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करून त्यांना विजयीही केले. त्यानंतर सेना-भाजप युती तुटून महाविकास आघाडी सत्तेवर आली. महेश शिंदे यांनी आघाडी धर्म पाळत पहिल्या दिवसापासून सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कोट्यवधींचा निधी मिळवून विकासकामे सुरू ठेवली. तालुक्याची विकासाची घोडदौड सुरू झाल्याने कार्यकर्ते, जनता समाधान व्यक्त करू लागली.
कोरेगाव मतदारसंघात गेल्या ३२ महिन्यांच्या कालावधीत कोविड काळात स्वखर्चाने उभारलेले कोविड उपचार केंद्र, त्याद्वारे हजारो गोरगरीब रुग्णांवर केलेले मोफत उपचार, राजकीय प्रतिकूल स्थिती असतानाही आपल्या कुशल कौशल्याने मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी खेचून आणलेला निधी, त्यात त्यांना सत्तासंघर्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची लाभलेली मदत, स्वतः जनता आणि कार्यकर्त्यांशी निर्माण केलेले जिव्हाळ्याचे नाते व एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी व्यक्तिगत ठेवलेले बंधूमित्रासारखे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता महेश शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असा कार्यकर्ते, जनता विश्वास व्यक्त करत आहेत.
MaheshShinde
koregaon
krushna
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 1st Jul 2022 02:12 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 1st Jul 2022 02:12 pm












