खंडाळा घाटात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात
दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर सहा जण जखमीSatara News Team
- Tue 21st May 2024 04:43 pm
- बातमी शेयर करा
लोणावळा : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाघजाई मंदिराच्या खालील बाजूला असलेल्या खंडाळा बॅटरी हिल येथील वळणावर भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री साडेदहा वाजता मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर हा पलटी होऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पडल्याने हा अपघात झाला. यामध्ये कार पूर्णपणे दबली गेली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी किशोर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 304 (अ) 279, 337, 338 मोटार वाहन अधिनियम 184,134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या भीषण अपघातात दत्तात्रय रामदास चौधरी (वय 55) व कवीता दत्तात्रय चौधरी (वय 46 वर्षे दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला. भुमीका दत्तात्रय चौधरी (वय 16 वर्षे), मितांश दत्तात्रय चौधरी (वय 9 वर्ष, दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव), योगेश श्रीराम चौधरी (वय 40 वर्षे), जान्हवी योगेश चौधरी (वय 31 वर्षे), दिपांशा योगेश चौधरी (वय 9 वर्ष), जिगीशा योगेश चौधरी (वय 1.5 वर्षे चौघेही राहणार संस्कृती बिल्डींग राव कॉलनी तळेगाव, ता. मावळ) हे जखमी झाले आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनर (MH 14 FT 1445) वरील चालकाचा खंडाळा बॅटरी हिल येथील उतार व वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने सदरचा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणारी कार (MH 14 BX 1605) वर पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कार कंटेनरच्या खाली पूर्णपणे दबली गेली. या अपघातात कारच्या चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला तर गाडीमधील अन्य सहा जण जखमी झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघाताच्या घटनेचा तपास लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड हे करत आहेत.
#accident
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 21st May 2024 04:43 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 21st May 2024 04:43 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 21st May 2024 04:43 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 21st May 2024 04:43 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 21st May 2024 04:43 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 21st May 2024 04:43 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Tue 21st May 2024 04:43 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 21st May 2024 04:43 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Tue 21st May 2024 04:43 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Tue 21st May 2024 04:43 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Tue 21st May 2024 04:43 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 21st May 2024 04:43 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Tue 21st May 2024 04:43 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Tue 21st May 2024 04:43 pm













