जिल्हय़ात 6 ठिकाणी पोलीसांनी टाकल्या धाडी, 5 लाख 22 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा  : पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार जिह्यात पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारुन कारवाई केली. यामध्ये 5 लाख 22 हजार 120 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन दंगा करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

खंडाळा पोलिसांनी पारगाव ते बावडा जाणाऱया रस्त्यावर येडय़ा बाभळीच्या झाडाच्या आडोशाला चालणाऱया अवैध ताडी विक्रीवर छापा मारला. त्यामध्ये राजू आशाअण्णा गौंड (वय 40, रा. पारगाव) याच्या ताब्यातून 510 रुपये किमतीची 25 लिटर ताडी हस्तगत केली. शाहूपुरी पोलिसांनी माची पेठ ते बोगदा जाणाऱया रस्त्यावर शिंदे हॉस्पिटलसमोर विदेशी दारु विक्री करणाऱया सोमनाथ शांताराम दळवी (वय 52, रा. परळी), प्रकाश शिवराम माने (वय 60 रा. कौंदणी) या दोघांवर कारवाई करुन त्यांच्याकडून चार चाकी वाहनांसह विदेशी दारुच्या 48 बाटल्या, मोबाईल असा सुमारे 5 लाख 17 हजार 200 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. बोरगाव पोलिसांनी समर्थगाव येथील डी. पी. जैन कंपनीसमोर वडापावच्या टपरीसमोर बेकायदेशीरपणे चालणाऱया दारु अड्डय़ावर छापा टाकून कारवाई केली. करीम अजित शेख (वय 30, रा. मंगळवार पेठ कराड) याच्या ताब्यातून 1820 रुपयांच्या 26 दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या.

वडूज पोलिसांनी बोंबाळे येथे अवैध दारु विक्री करणाऱया सविता तानाजी पवार (वय 38) हिच्यावर कारवाई करुन 980 रुपयांच्या 14 दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. कराड तालुका पोलिसांनी कासार शिरंबे येथील अंकुश पोपट यादव (वय 34) याच्यावर कारवाई करुन त्याच्या ताब्यातून 980 रुपयांच्या 14 बाटल्या हस्तगत केल्या. कराड शहर पोलिसांनी वारंजी गावच्या हद्दीत एम. एस. आर. डी. ए. ऑफिसच्या पाठीमागे झाडाच्या आड बेकायदेशीर दारु विक्री करणारा नवज्योत भाऊ सकट (वय 24) याच्यावर कारवाई करुन 630 रुपयांच्या 14 बाटल्या हस्तगत केल्या.

तसेच सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱयांवर कारवाई

औंध पोलिसांनी दत्त चौक औंध येथे सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन आरडाओरडा करणारा तानाजी तुकाराम निकम (वय 45, रा. भोसरे, ता. खटाव) याच्यावर कारवाई केली. दहिवडी पोलिसांनी फलटण चौकात अजित चंद्रकात जाधव (वय 23, रा. बिदाल) याच्यावर कारवाई केली. फलटण ग्रामीण पोलिसांनी वडजल येथे संदीप दशरथ रासकर (वय 40. रा. ठाकुरकी) यांच्यावर कारवाई केली.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त