साताऱ्याचा यष्टिरक्षक-फलंदाज साहिल औताडेची महाराष्ट्र संघात निवड
१९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धा
मंगेश कुंभार- Fri 4th Nov 2022 06:33 am
- बातमी शेयर करा
सातारा, : साताऱ्यातील डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज साहिल औताडे याची १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव इर्शाद बागवान यांनी दिली.
ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आयोजित करण्यात येते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १५ खेळाडूंचा संघ नुकताच निवडण्यात आला. कुचबिहार करंडक स्पर्धेचे सामने चार दिवसांचे (कसोटी) असतात. साहिल औताडेने जिल्हा क्रिकेट संघातून खेळताना आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र संघात स्थान मिळवून साहिलने सातारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र संघाचे सामने राजकोट, पुणे, पुदुचेरी येथे होणार आहेत. साहिलला शशी साळुंखे, रणजीत चव्हाण व कमलेश लांजेकर यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले. या निवडीबद्दल साहिलचे माजी रणजीपटू केतन दोशी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी, एम सी ए प्रतिनिधी कमलेश पिसाळ, आजी-माजी क्रिकेटपटू व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 4th Nov 2022 06:33 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 4th Nov 2022 06:33 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 4th Nov 2022 06:33 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 4th Nov 2022 06:33 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:33 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:33 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 4th Nov 2022 06:33 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 4th Nov 2022 06:33 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 4th Nov 2022 06:33 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 4th Nov 2022 06:33 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 4th Nov 2022 06:33 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 4th Nov 2022 06:33 am













