दुर्गा देवी विसर्जन तसेच शाही सीमोल्लंघन सोहळ्या निमित्त शनिवारी सातारा शहरामध्ये अंतर्गत वाहतूक मार्गात बदल

सातारा :  सातारा शहरामध्ये दिनांक १२/१०/२०२४ रोजी दुर्गा विसर्जन तसेच शाही सीमोल्लंघन सोहळा असून विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांकडून विसर्जन केले जाते ते पाहण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून नागरीकांची तसेच वाहनांची देखील मोठया प्रमाणात गर्दी होते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये अपघात घडू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दि. १२ ऑक्टोबर शनिवार १०:०० वा. पासून ते १३ ऑक्टोबर रविवार सकाळी ०७:०० वा. पर्यंत सातारा शहरातील अंतर्गत वाहतूकीचे मार्गात खालीलप्रमाणे बदल करणेत येत आहे.


 अ) दैनंदिन वाहतूकीचे बंदी घालण्यात येणारे मार्ग :-

 १) राजपथावर कमानी होद देवी चौक मारवाडी चौक मोती चौक पर्यंत येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद

 २) कमानी हौद ते शेटे चौक पर्यंत येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद,

 ३) कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक पर्यंत येणारे जाणारे प्रवेश बंद -

 ४) मोती चौक एम.एस.ई.बी. ऑफिस समर्थ टॉकिज राधिका टॉकिज चौक ऐक्य प्रेस कॉर्नर बुधवार नाका चौक गणेश विसर्जन कृत्रीम तलाव - कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ पर्यत येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद.

 ५) स्टेट बॅक प्रतापगंजपेठ सातारा (काटदारे मसाले दुकान) - डि.सी.सी. बॅक मोती तळे पर्यत येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद.

 ६) विठोबाचा नळ ते जलमंदिर कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

 ७) मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यंत येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद.

 ब) समर्थ मंदिर ते चौदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद

 क) बोगदा शाहू चौक हा मार्ग जड वाहनांसाठी (एस.टी. बस सह) व अवजड वाहनांसाठी बंद राहील (सज्जनगड व कास पठार कडे जाणारी व येणारी जड वाहने (एस. टी. बस सह) व अवजड वाहने बोगदा, शेद्रे मार्गे जातील व येतील )

 ड) वाहतूक मार्गातील बदल :- १) बोगदा, समर्थ मंदिराकडून चांदणी चौक मार्गे एस. टी. स्टॅन्ड साताराकडे येणारी सर्व वाहन (जड व अवजड वाहने वगळून) चांदणी चोक राजवाडा मार्गे न येता समर्थ मंदिर, अदालतवाडा, शाहूचौक मार्गे एस.टी. स्टॅन्ड साताराकडे जातील.

 २) मोळाचा ओढा कडून सातारा शहरात येणारी सर्व वाहने ही मोळाचा ओढा, महानुभव मठ, करंजे, भुविकास बँक चौक, मार्गे मार्गस्थ होतील.

 ३) कोटेश्वर मंदीर - राधिका टॉकीज चौक राधिका रोड मोळाचा ओढा मार्गे महानुभव मठ, करंजे, भुविकास बँक मार्गे

 ४) मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहूचीक अदालत वाडा - मार्गे एस. टी. स्टॅन्ड येणारी वाहने ही कोटेश्वर मंदीर शाहुपूरी एस. टी. स्टॅन्ड कडे येतील. मार्गे समर्थ मंदीर मार्गस्थ होतील.

 ५) शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅन्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणान्या रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावे.

 ६) मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे येथे बुधवार नाका जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आपली वाहने शाहूपुरी अथवा पर्यायी मार्गांने घेऊन जावे.

 ७) वरील सर्व मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात वरील प्रमाणे बदल करणेत येत आहे.

 पार्किंग :- दुर्गा विसर्जन करीता येणारे नागरीकांनी आपली वाहने ९) तालिम संघाजवळील मैदान (२) गुरुवार परज (३) गांधी मैदान (४) कोटेश्वर मैदान या चार ठिकाणी अथवा आपल्या पर्यायी जागेत पार्किंग करावीत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त