फलटण तालुक्यात मराठ्यांची एकजूट नारायणगड च्या दिशेने रवाना

फलटण : आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी गेली अनेक दिवस मराठा समाजासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्च करून मराठा योद्धा क्रांतीसुर्य माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला न्याय मिळण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चलो नारायण गडचा नारा दिला असून यांच्या आवाहनाला साथ देण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्वच मराठा बांधव स्वयंस्फूर्तीने जोरदार प्रतिसाद देत आहेत.

 मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या समन्वयकांनी संपूर्ण तालुक्यात वाडी वस्तीवर भेट देऊन संपूर्ण फलटण तालुका दौरा पूर्ण केला. मराठा समन्वयकांच्या या विनंतीला मान देऊन तालुक्यातील पूर्ण मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला. नारायणगड येथे दसरा मेळावा उत्तम रीतीने साजरा करण्यासाठी मराठा समाज शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर पासून नारायणगड च्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली आहे

 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीस सुरुवात होत आहे तरीही सर्व मराठा बांधव मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी नारायणगड येथे मार्गस्थ होत आहेत. दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगड येथे मेळाव्याची शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले आहे. नारायणगड येथे शेकडो ऐकर जागेत अत्यावश्यक अश्या सर्व सुविधा उपलब्ध करून कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेउन नियोजन पूर्ण झाले आहे. संपूर्ण फलटण तालुक्यातील मराठा बांधव स्वयंपूर्ण उत्साहाने एकजुटीने मार्गस्थ होत आहेत.

 सर्व मराठा समन्वयक आणि मराठा बांधव प्रत्येक घरातून ऐक या प्रमाणे उत्साहाने नारायण गड कडे मार्गस्थ होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयं स्फूर्ती ने लाखोंच्या संखेने मराठा क्रांती सूर्य माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी दी.९ऑक्टोबर पासुन नारायणगड येथे उपस्थित होत आहेत. मार्गावर अतिशय शिस्त बध्द पद्धतीने वाहनावर आपल्या गावाचे नाव आणि इतर माहिती नमूद करुन , वाहतुकीचे नियमन पालन करतमार्गस्थ होत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त