आजचे राशि भविष्य ,पंचांग २६ ऑगस्ट २०२२ : अमावस्या तिथी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या

आजचा शुभ मुहूर्त २६ ऑगस्ट २०२२ : ब्रह्म मुहूर्त सकाळी ०४ वाजून २७ मिनिट ते ०५ वाजून १२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३२ मिनिट ते ०३ वाजून २३ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिट ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ३७ मिनिट ते ०७ वाजून ०१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ०४ वाजून ४८ मिनिट ते ०६ वाजून ३३ मिनिटांपर्यंत.

राहूकाळ पुर्वान्ह १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी मध्यान्ह १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत. त्यानंतर अमावस्या तिथीची सुरुवात. आश्लेषा नक्षत्र संध्याकाळी ०६ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्राची सुरुवात

गुरुवार, २५ ऑगस्ट २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आज उत्तम गृहसौख्य, कौटुंबिक सौख्य व वास्तूसौख्य आपणास लाभेल. कुटुंबीयांसमवेत मनसोक्त वेळ व्यतीत कराल. संततीकडेही लक्ष द्याल.

वृषभ
आपल्यातील कलाकौशल्याला आज मेहनत व परिश्रमाची जोड देऊन आपले इप्सित साध्य कराल. आज आपल्यातील लेखन कौशल्यालाही उत्तम वाव मिळेल.

मिथुन
आज उत्तम पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल. आपल्या खेळीमेळीच्या स्वभावाने आज कुटुंबातील सर्वांना आपला सहवास हवाहवासा वाटेल.

कर्क
आजचा आपला दिवस नाविन्याने परिपूर्ण असेल. कुटुंबियांबरोबर काही छान क्षण व्यतीत कराल. आपल्या आनंदात आज जोडीदाराचेही सहकार्य लाभेल.

सिंह
आज आपण अडचणी, विवंचना यांचा सामना करतच नवीन उभारी देखील घ्याल. खर्चाचा योग्य ताळमेळ साधाल.

कन्या
गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या लाभप्राप्तीने हुरळून न जाता खर्चाचे योग्य नियोजन ठेवणे आवश्यक राहील. विनाकारण कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नये.

तुळ
आजच्या दिवशीही कामातच व्यस्त असाल. मात्र आपल्या कर्तव्यपूर्तीनंतर त्याची शुभ फळे आपणास निश्चितच मिळतील.

वृश्चिक
आज काही महत्वाची कामे पूर्ण करण्याकडे मनाचा ओढा राहील. आपणावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या आपण निश्चित पार पाडाल.

धनु
आज काही पारिवारिक, कौटुंबिक समस्या सतावतील. मात्र आपण त्यावर समाधान शोधून काढाल.

मकर
आज काही अपेक्षित अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे सजगता बाळगावी. जोडीदाराशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कुंभ
आज प्रकृतीत सुधारणा जरी वाटली तरी लगेच अतिश्रम करण्यास जाऊ नका. आरोग्याची काळजी घेणेच हितावह राहील.

मीन
आज अतिउत्साह वा अतिश्रमाने आरोग्यावर परिणाम होणार नाही ना याची काळजी घ्यावी. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये.

आजचा अशुभ मुहूर्त २६ ऑगस्ट २०२२ :

राहूकाळ १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ०३ वाजून ३० मिनिट ते ०४ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ०७ वाजून ३० ते ०९ वाजेपर्यंतगुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ दुपारी ०८ वाजून ३१ मिनिट ते ०९ वाजून २२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर १२ वाजून ४९ मिनिट ते ०१ वाजून ४० मिनिटांपर्यंत.

 

   सौ . कांचन थिटे 
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (m.s)

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त