रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी मा.श्री. चंद्रकांत दळवी IAS (Retd) यांची निवड
Satara News Team
- Sun 28th May 2023 01:15 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : निढळ ता खटाव येथील वरिष्ठ माजी सनदी अधिकार चंद्रकांत दळवी यांची आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संस्थेच्या वाटचालीसाठी सुद्धा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चंद्रकांत दळवी यांच्या सारखा एक कुशल प्रशासक संस्थेच्या कुलाधिकारी पदी आणि आता चेअरमन पदी विराजमान झाल्या मुळे निढळ व निढळ परिसरात आनंद निर्माण झाला आहे. चंद्रकांत दळवी यांची आजवरची कारकीर्द अत्यंत पारदर्शक राहीली असुन सामान्य नागरिकांच्या हिताची तसेच त्या पदाला न्याय मिळवून देणारी ठरली आहे. रयत शिक्षण संस्थेची धुरा आता दळवी यांच्या हाती देण्यात आली आहे ही आनंददायीच बाब आहे.रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कुल मध्ये शिकलेला मुलगा आज त्याच संस्थेचा चेअरमन झाला आहे. आजवरचा दळवी यांचा प्रवास हा प्रेरणादायीच राहीला आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 28th May 2023 01:15 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 28th May 2023 01:15 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 28th May 2023 01:15 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 28th May 2023 01:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 28th May 2023 01:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 28th May 2023 01:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 28th May 2023 01:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 28th May 2023 01:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 28th May 2023 01:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 28th May 2023 01:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 28th May 2023 01:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 28th May 2023 01:15 pm













