जेष्ठ विधितज्ञ adv. कॉमरेड धैर्यशील पाटील यांचे निधन
Satara News Team
- Wed 14th Sep 2022 08:23 am
- बातमी शेयर करा
सातारा : बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी चेअरमन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी चेअरमन, सातारचे निष्णात फौजदारी विधिज्ञ अॅड. धैर्यशील पाटील तथा डी.व्ही. दादा यांचे आज निधन झाले. महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले तसेच सातार्यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, पैलवान संजय पाटील खून खटला अशा महत्वपूर्ण खटल्यांचे काम त्यांनी पाहिले होते. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ ते वकिली व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने विविध स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आज (बुधवारी) सायंकाळी सदरबझार येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.अॅड. डी.व्ही. पाटील यांचा जन्म १४ जुलै १९४३ रोजी झाला. वकिलीची पदवी घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यासह देशभर त्यांनी ठिकठिकाणच्या विविध खटल्यांमध्ये काम केले. फौजदारी संहितेवर त्यांची कमालीची पकड राहिली. वकिलीचे काम करत असतानाच संघटन कौशल्य राबवत अनेक सामाजिक संघटनांवर त्यांची निवड झाली. गोरगरीब, कष्टकरी व श्रमिकांसाठी त्यांनी अहोरात्र काम केले. कामगार व कष्टकरी समाजासाठी त्यांचे काम महत्वपूर्ण राहिले असून डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता.अॅड. डी.व्ही. पाटील यांच्या मागे त्यांचा मुलगा अॅड. सिध्दार्थ पाटील हे वकिली क्षेत्राचा वारसा जपत आहेत. दुसरा मुलगा निशांत पाटील सातारा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 14th Sep 2022 08:23 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 14th Sep 2022 08:23 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 14th Sep 2022 08:23 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 14th Sep 2022 08:23 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 14th Sep 2022 08:23 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 14th Sep 2022 08:23 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 14th Sep 2022 08:23 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 14th Sep 2022 08:23 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 14th Sep 2022 08:23 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 14th Sep 2022 08:23 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 14th Sep 2022 08:23 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 14th Sep 2022 08:23 am










