खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?

मा.तहसिलदार यांनी ध्वजाचा अवमान केल्याने गुन्हा दाखल करणेची आवश्यकता

पुसेसावळी : भारताने ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वज उघडला (unfurl), महाराष्ट्रातही प्रत्येक सरकारी कार्यालयात, शाळेत, तालुक्यात हाच नियम काटेकोरपणे पाळला गेला असेल. पण खटाव तालुक्यातील तहसिल कार्यालय (वडूज) मध्ये एक वेगळीच "क्रांती" घडली!

मा.तहसिलदार बाई माने यांच्या हस्ते सकाळी ९:१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले! होय, ध्वजारोहण – म्हणजे ध्वज खाली बांधून वर खेचणे, जे फक्त १५ ऑगस्टला (स्वातंत्र्य दिन) करायचे असते. प्रजासत्ताक दिनी तर ध्वज आधीच वर असतो, फक्त गुंडाळी उघडून (unfurl) फडकवायचा असतो. हे प्रतीक आहे – स्वातंत्र्य मिळवण्याची लढाई संपली, आता प्रजासत्ताकाची निरंतरता चालू आहे.

पण खटावच्या विद्यमान तहसिलदारांना आज जनतेला कदाचित सांगायचे असेल की, "अरे, आम्ही तुम्हाला आजच नवं स्वातंत्र्य मिळवून देतोय! १९४७ ची आठवण आज २०२६ मध्ये ताज्या दाखल करून देतो!" परिणामी, खटावच्या जनतेला एकाच दिवसात दोन स्वातंत्र्य मिळाले. एक १५ ऑगस्टचा खरा, आणि दुसरा ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा "बोनस" स्वातंत्र्य!

               सदरच्या ठिकाणी, वेळी मा.तहसिलदार बाई माने यांनी ध्वजारोहण केले, मानवंदना दिली.स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी, वीर माता, वीर पत्नी, वीर बंधूंचा सन्मान.पोलिस प्रशासनानेही सलामी.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, पथनाट्य सादर केले. पण कुठे तरी "ध्वजवंदन" ऐवजी "ध्वजारोहण" चाच शब्द ही वापरला गेला आणि कृती ही केली गेली.मात्र उपस्थित अधिकारी, शिक्षक, व्यापारी, राजकीय,सामाजिक, नेते  सगळे आनंदात,पण नियमांची आठवण कुणालाही आली नाही का?


            मा.तहसिलदारांनी खटावच्या जनतेला ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नेमकं कसं स्वातंत्र्य मिळवून दिले? की फक्त ध्वज संहितेचे उल्लंघन करून "स्वातंत्र्य" ची नवी व्याख्या सांगितली? Flag Code of India २००२ आणि Prevention of Insults to National Honour Act, १९७१ नुसार हे तांत्रिकदृष्ट्या अपमानास्पद आहे. पण अपघाती असल्यास फक्त चेतावणी दिली जाते तरीही, तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी या तालुक्यातील मुख्य प्रशासकीय पदांवर कार्यरत असलेल्या उच्च विद्याविभूषित सरकारी अधिकाऱ्याने हे केल्याने संबंधित वरिष्ठ अधिकारी या घटनेनंतर असे अपमानास्पद कृत्य करणाऱ्या मा. तहसिलदार यांचेवर फक्त सुचना देण्यात धन्यता मानतात कि सुओ मोटो अंतर्गत गुन्हा दाखल करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियम शिकवणारे स्वतः ध्वज संहिता नियम विसरले? अशा प्रकारच्या प्रश्नांसह जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे.


             मा. तहसिलदारांच्या मते खटावमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन नव्हता, तर "स्वातंत्र्य दिन २.०" साजरा झाला असावा! पुढच्या वर्षी कदाचित तहसिलदार म्हणतील, "आम्ही २६ जानेवारीला १५ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टला २६ जानेवारी करून बॅलन्स राखतोय!" त्यामुळे हुतात्म्यांच्या या खटाव तालुक्यातील जनतेकडून त्यांना विनंती आहे. ध्वज हा अभिमान आहे, त्याचे प्रतीक समजून घ्यावी, ध्वज संहिता बघावी त्यासोबतच केलेल्या कृती बद्दल जनतेची जाहीर माफी मागावी आणि विनंती करून मा.तहसिलदार बाईंनी पुढच्या वर्षी unfurl करावे, hoist नव्हे! अन्यथा खटावला "स्वातंत्र्य" मिळेल, पण नियमांचे "बंधन" वाढेल!

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला