किसन वीर'कडून ऊस तोडणी वाहतुकदारांना ॲडव्हान्सचे वाटप

वाई  ; भुईज, दि. ७/७/२०२२ : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे करार नुकतेच करण्यात आलेले होते. वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व कारखान्याचे अध्यक्ष मकरदंआबा पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार ऊस तोडणी वाहतुकदारांना अॅडव्हान्सचे वाटप करण्यात आले असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले •असून आमच्या व्यवस्थापनावर निश्चितपणे विश्वास बसेल, असा आशावाद कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केला.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्याची सुत्रे आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाकडे आल्यानंतर दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने चालविण्याच्यादृष्टीने ऊस तोडणी वाहतुक कराराचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तसेच दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने चालविण्याच्यादृष्टीने अंतर्गत कामेही पुर्ण क्षमतेने सुरू असुन कारखान्याचे भाग भांडवल वाढविण्याचे कामही उस्त्फुर्तरित्या सुरू आहे. आजमितीस कारखान्याकडे ४३० ट्रॅक्टर गाडी व २०० बैलगाड्यांचे करार पूर्ण झालेले असून त्यांना अॅडव्हान्सपोटी सुमारे ९ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित वाहन टोळ्यांच्या कराराचे कामही अंतिम टप्प्यात असुन त्यांनाही अॅडव्हान्स वाटप प्रकिया सुरू आहे. तरी स्थानिक वाहन धारकांनी आपले करार किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे लवकरात लवकर करावे, असे आवाहनही उपाध्यक्ष शिंदे यांनी यावेळी केले..
ऊस तोडणी वाहतुकदारांना धनादेश प्रदान करतेवेळी कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, प्रकाश धुरगुडे, ललित मुळीक, सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीचे अध्यक्ष मानसिंगराव साबळे, अॅग्री मॅनेजर विठ्ठलराव कदम, मॅनेजर बी. आर. सावंत, ऊस तोडणी मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला