निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण
Satara News Team
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
- बातमी शेयर करा
सातारा : खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे लोकसभा निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील शासकीय कर्मचाऱ्याला नाकाबंदीदरम्यान गाडी तपासणी करताना पोलिसाने मी आमदार, खासदाराच्या गाड्या चेक करतो, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुहास विलास गुरव (रा. बनवडी काॅर्नर, कऱ्हाड. मूळ रा. कनेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. तर अजय विलास माने (रा. म्हासुर्णे, ता. खटाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यामधील फिर्यादी हे कऱ्हाड येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागात लिपिक आहेत. सध्या त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १७ रोजी रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांची ड्यूटी कऱ्हाड-विटा मार्गावरील चोराडे फाटा येथे होती. त्यांच्याबरोबर इतर कर्मचारीही होते. वाहन तपासणीकामी सर्वांची नियुक्ती करण्यात आलेली.
दि. १७ रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास नाकाबंदी करताना कार (एमएच ११ डीएच ०४४९) थांबवली. त्यावेळी वाहनचालकास गाडीची तपासणी करायची आहे, असे म्हटले. यावरून संशयिताने मी पोलिस आहे. ओळखपत्र दाखवू का, मी आमदार, खासदाराच्या गाड्या तपासतो. तुमची लायकी आहे का, असे म्हणून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून सुहास गुरव यांना मारहाण करण्यात आली. यावेळी संशयिताने माझे नाव अजय माने आहे. मी पोलिस असून, सारोळा येथे नोकरी करतो. तुला काय करायचे ते कर, मी कोण आहे ते दाखवतो, अशी धमकीही दिली. त्यानंतर संशयित निघून गेला.
याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 19th Apr 2024 12:12 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 19th Apr 2024 12:12 pm













