वाई येथील पश्चिम भागातील गावांना तहसिलदार यांनी दिली भेट .

वाई : वाई च्या पश्चिम भागातील पसरणी आणि धोम मंडळातील गावांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी च्या अनुषंगाने आज या भागातील एकसर, दसवडी, बोरगाव, दह्याट, वयगाव, उलुम्ब - बलकवडी, नांदगणे, वासोले, कोंढवळे, जांभळी  या गावामध्ये आज तहसीलदार वाई आणि गट विकास अधिकारी वाई यांनी भेट देऊन तेथील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची भेट आणि बैठक घेऊन मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे काही नुकसान झाले असल्यास त्याची माहिती घेतली तसेच  एखाद्या गावात अतिवृष्टी झाल्यास घ्यावायची काळजी व खबरदारी या बाबत सूचना दिल्या. तसेच सदर गावातील डोंगराच्या व ओढ्याच्या कडेला असलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रामपंचायत यांनीही रात्रीच्या वेळी ग्राम रक्षक दल व गावातील तरुण मंडळाच्या मदतीने रात्रीच्या वेळी ग्रामपंचायत पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही विपरीत घटना होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्याच्या सूचना दिल्या. सदर माहिती घेताना धोम व पसरणी मंडळात एकूण 9 घरांचे अंशता नुकसान झाल्याचे दिसून आले. सदर सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत.


या वेळी तहसीलदार वाई यांच्या सोबत श्री. नारायण घोलप गटविकास अधिकारी वाई, तसेच राजेंद्र बेलोशे मंडळ अधिकारी पसरणी, लतिका कोरडे, मंडळ अधिकारी धोम तसेच श्री. भोईर, विस्तार अधिकारी आणि पसरणी आणि धोम मंडळातील सर्व तलाठी व ग्रामसेवक उपास्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला