खटाव तालुक्यातील युवा नेते अतुल पवार यांच्या कार्याची मान्यवरांनी घेतली दखल,,,,

वडूज  - .उंबर्डे ता - खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अतुलदादा पवार यांच्या कार्याची मान्यवरांनी दखल घेतली.वडूज ता खटाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्क कार्यालयात मान्यवरांचा उपस्थित श्री पवार यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

         सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या खटाव तालुक्यातील युवा पिढीचे कौतुक करून त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी या हेतूने लोक शाहीर आण्णा भाऊ साठे स्मुर्ती दिनानिमित्त हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

     यावेळी  अड.अशोक बापू शिंदे, येरळा सामाजिक संस्थेचे संस्थापक  व ज्येष्ठ पत्रकार धनंजय क्षिरसागर,अजित जगताप, मुन्ना मुल्ला, नितीन राऊत,राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर,रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश भोसले,उद्योजक विक्रमसेठ जाधव,निखिल इंदापुरे, महादेव बनसोडे,आनंदा साठे,दत्ता केंगारे,लहुराज काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

        लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी अन्याय विरुद्ध लढण्याचे बळ देले आहे त्यांच्या स्मुर्ति दिनी होणार सत्कार हा मनाला उभारी देणारा आहे.सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येतात. परंतु ,समाजातील मोठा वर्ग हा पाठीशी उभा राहत असल्याने जनतेच्या न्यायालयात न्याय मिळाला आहे अश्या शब्दात श्री पवार यांनी  भावना व्यक्त केल्या. सध्या बंड केल्याशिवाय गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे असे ही ते म्हणाले.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

           शिकार करणाऱ्या हिंस्र प्राण्यापासून गरीब लहान प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी शौर्य लागते. जे भित्रे असतात ते हिंस्र प्राण्याच्या बाजूने उभे राहतात त्यांना समाज ओळखून आहे. अश्या परिस्थितीत सत्कार सोहळा होणे एक प्रकारे बळ देणारे आहे असे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देताना सांगितले.यावेळी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त