सातारा वर्ये येथील दोन प्लायवूडच्या दुकानाला भीषण आग

व्यावसायिकांचे मालमत्तेचे कोट्यावधीचे नुकसान अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न

सातारा : वर्ये ता.सातारा येथील दोन्ही प्लायवूडच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली आहे. या आगीत शामुलचंद ओसवाल व रूपाशेठ या व्यावसायिकाच्या मालमत्तेचे कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुकानातील फ्लायवूड व केमिकलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले असून परिसरात सर्वत्र धुराचे लोट मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. या भीषण घटनेमुळे परिसरातील बघ्यांनी गर्दी केली आहे.  वर्ये हद्दीतील रामनगर कालव्यानजीक असलेल्या या फ्लायवूडच्या दुकानाला मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानातील कामगारांच्या आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करीत संबंधित मालकास दूरध्वनीवरील कळविले. मात्र दुकानातील मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लायवुडच्या विशेषतः केमिकलमुळे आगिने भीषण स्वरूप धारण केले होते.काही क्षणातच आगीच्या माहाकाय ज्वालांनी वेढले. या भीषण आगीने शेजारील रूपचंद सोळंकी यांचे घरे व रूपाशेठ यांच्या दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे.या आगीने शेजारील कुटुंबातील लोक हादरून गेले असून महिलांना अश्रू अनावर झाले आहेत.आग विझवण्यासाठी सातारा व भुईंज साखर कारखान्याचा अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले असून दोन्ही बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दुकानदार हादरून गेले आहेत.आगीचे कारण अद्यापही समजू शकलेली नाही.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला