फलटण पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त

फलटण : फलटण  पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने शहरातील नागरिक  त्रस्त झाले आहेत मागील दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी प्रशासक कारभार पहात आहेत यापूर्वी चे मुख्याlधिकारी यांची बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या मुख्याधिकारी यांची अजून प्रशासनावर पकड दिसत नाही यामुळेच कर्मचारी व अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार चालवत असल्याचे दिसते कार्यालयीन कामकाज सकाळी पावणे दहा वाजता सुरू होते परंतू कर्मचारी व अधिकारी तब्बल एक तास उशिरा येत असल्याचे दिसते  

              विविध कामांसाठी व दाखल्यासाठी नागरिक पालिकेत हेलपाटे मारतात अनेक वेळा कर्मचारी उपलब्ध नसल्याने  नागरिक विवंचनेत आहेत पालिकेवर प्रशाशक म्हणून स्वतः मुख्याधिकारी असताना प्रशासनात मात्र गोंधळ दिसतो शहरात कचऱ्याचे ढीग यापूर्वी दिसत नव्हते आता मात्र ते सर्रास दिसतात 

             पालिकेत असणाऱ्या पाणी पुरवठा विभाग , जन्म मृत्यू विभाग बांधकाम विभाग मुख्याधिकारी कार्यालय नागरी सुविधा केंद्र मालमत्ता उतारा विभाग या ठिकाणी वेळेत हजर असणारा एकही कर्मचारी नव्हता आपल्या विविध कामासाठी आलेले नागरिक मात्र ताटकळत उभे होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त