मांढरदेव भाविकांच्या पिकप गाडीला अपघात

वाई : शाळांना उन्हाळी सुट्टी असल्या कारणाने मांढरदेवीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असताना पहावयास मिळत आहे.भोर घाट रस्त्याचे काम सुरू असून देखील पुण्यावरून येणारे भाविक वाईच्या घाटातून मांढरदेवी काळुबाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येताना दिसत आहेत.
        शुक्रवार देवीचा वार असल्याकारणाने येथे भाविकांनी सकाळीच गर्दी केली होती. देवस्थान ट्रस्ट कडून मंदिर परिसरामध्ये विविध प्रकारची विकास कामे सुरू असल्यामुळे. भाविकांच्या गाड्या पार्किंग क्षेत्रापासून वर मंदिराकडे नेण्यास सक्त मनाई केलेली असताना देखील.काही स्वार्थी लोकांकडून देवस्थानच्या या नियमाचे उल्लंघन करून आपल्या हितासाठी भाविकांना फुस लावून त्यांच्या गाड्या मंदिराकडे नेताना दिसत आहे.त्यांनी त्यांच्या हितासाठी आपल्या व्यवसायाकडे जाणारे बेकायदेशीर जे रस्ते बनवले आहेत.ते अतिशय तीव्र उताराचे, खाच खळग्याचे व पूर्णपणे मातीचे आहेत.त्यामध्ये अनेक भाविकांच्या गाड्यांना वारंवार अपघात होत असतात.म्हणून अशा लोकांना मांढरदेव देवस्थान ट्रस्ट मार्फत वारंवार सूचना देखील देण्यात आलेल्या असल्याचे समजाते आहे.तरीही असे अपप्रवृत्तीचे स्वार्थी लोक भाविकांच्या जीवाशी खेळताना दिसत आहेत.
       अशाच एका बेकायदेशीर रित्या केलेल्या रस्त्यावर आज भाविकांच्या पिकप गाडीचा अपघात झाला.त्यात गाडीतील लोकांना मोठ्या प्रमाणावरती इजा झाल्या.गाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने देवीच्या कृपाआशीर्वादाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.जखमी झालेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या बसमधून दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. जखमी झालेल्या भाविकांमध्ये पुरुष,महिला सह लहान मुलांचा देखील समावेश होता.त्यामुळे सदर झालेला घटनेतून पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडवून कोणा भाविकाला आपल्या जीवला मुकावे लागणार नाही.याची दक्षता घेऊन  देवस्थान ट्रस्टने अशा लोकांवर कडकात कडक कारवाई करून यांना वेळीच आळा घालावा.अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त