शाळा प्रवेश दिनानिमित्त विविध कार्यक्रमासह बार्टीच्या पुस्तकांचा लाभ मिळणार !
विशाल कांबळे - Sat 5th Nov 2022 10:37 am
- बातमी शेयर करा
सातारा : ७ नोव्हेंबर १९०० रोजी येथील छ. प्रतापसिंह हास्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्राथमिक शाळेत प्रवेश दिनानिमित्त विविध कार्यक्रमासह बार्टीतर्फे प्रकाशीत पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात भारतीय संविधान व इतर पुस्तके वितरित करण्यात येणार आहे.तेव्हा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्ह्यातील सर्व समता दूत यांच्यावतीने प्रकल्पाधिकारी दिलीप वसावे यांनी केले आहे.
बाबासाहेब यांनी शाळेत प्रवेश घेतला होता.तेव्हा त्यांचे नाव भिवा होते. त्याची नोंद शाळेतील दस्तऐवजमध्ये आहे. नोंद वहीत “१९१४” क्रमांका समोर आजही बाळ भिवाची स्वाक्षरी असलेले ऐतिहासिक दस्तऐवज प्रतापसिंह हास्कूल या शाळा प्रशासनाने जपून ठेवलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतापसिंह हास्कूल या शाळेत पहिले पाऊल पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले. त्याचमुळे असंख्य वंचित, दुर्लक्षित बहुजन वर्गाचे उद्धारकर्ते ठरले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेल्यामुळेच त्याचे लिखित भारतीय संविधानाचा संपूर्ण जगात गौरव होत आहे.त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.त्यामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस अत्यंत महत्वाचा आणि वंचित, दुर्लक्षित, बहुजन समाज यांच्या करीता ७ नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला विद्याव्यासंग शेवटपर्यंत जपला.उच्च दर्जाची विधवत्ता व ज्ञान असतांनाही आजन्म विद्यार्थी राहिले व आदर्श विद्यार्थी ठरले. त्यामुळे विद्यार्थी प्रवेश दिनाला अतिशय महत्व प्राप्त होते.म्हणून महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी परिपत्रक द्वारे विद्यार्थी दिवस घोषित केलेला आहे.त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात धम्मज्योती गजभिये महासंचालक, इंदिरा अस्वार (निबंधक), उमेश सोनवणे (उपायुक्त), सचिन जगदाळे (कार्यालय अधिक्षक),नितीन उबाळे (सहा.आयुक्त, समाजकल्याण) नसरीन तांबोळी (सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक समतादूत कक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, काव्य वाचन जनजागृतीपर रॅली आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात बार्टी समतादूत विभागामार्फत उपक्रम घेण्यात आले आहेत. त्याची सुरुवात ०७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सातारा येथून रॅलीच्या माध्यमातून प्रारंभ होत आहे.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 5th Nov 2022 10:37 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 5th Nov 2022 10:37 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 5th Nov 2022 10:37 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 5th Nov 2022 10:37 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 5th Nov 2022 10:37 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 5th Nov 2022 10:37 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Nov 2022 10:37 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Nov 2022 10:37 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 5th Nov 2022 10:37 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 5th Nov 2022 10:37 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 5th Nov 2022 10:37 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 5th Nov 2022 10:37 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 5th Nov 2022 10:37 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 5th Nov 2022 10:37 am













