कराडमध्ये मगरीचा पोहणाऱ्या व्यक्तीवर हल्ला
प्रकाश शिंदे - Fri 4th Nov 2022 06:32 am
- बातमी शेयर करा
कराड; कृष्णा कोयना नदीच्या संगमावर नदीमध्ये पोहरणाऱ्या मधुकर लक्ष्मण थोरात यांच्यावर मगरीने हल्ला केला. यामध्ये थोरात हे जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली. या हल्ल्यात त्यांच्या पायाला जखम झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, कराड येथील कृष्णा नदीत रोज सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक पोहायला येत असतात. रोज पोहणारे तीन मोठे ग्रुप आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस जणांचा एक ग्रुप या ठिकाणी पोहायला गेलेला होता. पोहणारे तीन-चार लोक नदीच्या आत बरोबर मध्यभागी गेले असता, यामधील मधुकर थोरात यांच्या पायाला कोणीतरी ओढत असल्याची त्यांना जाणीव झाली. यावेळी त्यांनी पाहिले असता मगरीने त्यांच्या पायाला तोंडात पकडले असल्याचे त्यांना दिसले. यामुळे ते घाबरले. त्यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली.
त्यामुळे त्यांचे इतर दोन मित्र जवळ आले. त्यांनी मधुकर थोरात यांना नदीतून बाहेर काढले. त्यांना सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर कृष्णा नदीमध्ये पोहायला येणाऱ्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोहायला येणारे अनेक लोक या घटनेमुळे नदीकाठी थांबले होते.
स्थानिक बातम्या
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Fri 4th Nov 2022 06:32 am
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Fri 4th Nov 2022 06:32 am
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Fri 4th Nov 2022 06:32 am
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Fri 4th Nov 2022 06:32 am
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Fri 4th Nov 2022 06:32 am
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 4th Nov 2022 06:32 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:32 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:32 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 4th Nov 2022 06:32 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 4th Nov 2022 06:32 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 4th Nov 2022 06:32 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 4th Nov 2022 06:32 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 4th Nov 2022 06:32 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 4th Nov 2022 06:32 am













