तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजाविषयी आदर आणि प्रेम आहे का ? खा. संजय राऊत

पूर्वी छत्रपती पेशव्याना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत सातारामध्ये हे काही महाराष्ट्राला मान्य नाही असा टोला त्यांनी लगावला ही स्वाभिमान्यांची गादी आहे. स्वाभिमानासाठी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्याग केला ब्रिटिशांसमोर ते झुकले नाहीत. आणि त्याच्या वंशजांनी भाजपसोबत तडजोड केली.

सातारा :आज ऐतिहासिक आणि अत्यंत क्रांतीकारी अशा सातारा शहरामध्ये आहे. क्रांती काय असते ते महाराष्ट्राला स्वातंत्र्य लढयापासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत साताऱ्याने दाखवून दिले आहे  बलाढ्य शक्तिविरुध्द पत्री सरकार चालवणारे हे सातारा आहे. इथला अजिंक्यतारा मी मघाशी पाहिला शिवसेनेची परिस्थिती अजिक्यता यासारखीच आहे. या अजिंक्यताऱ्याने असे अनेक गद्दार पाहिले आहेत. अनेक घाव या अजिक्यताऱ्याने छातीवर आणि पाठीवर झेलले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजाविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यावेळी खालून कोणीतरी पंतांचे केले असा उल्लेख केला. त्यावर कोणते पंत असा प्रश्न राऊत यानी केला असता, टरबुज टरबुज असा नारा झाला. त्यावर राऊत म्हणाले. पूर्वी छत्रपती पेशव्याना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत सातारामध्ये हे काही महाराष्ट्राला मान्य नाही शिवसेना आज चक्रव्युहात सापडली असे कुणाला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अशा अनेक सकटातून, चक्रव्युहातून कोडी फोडून शिवसेना बाहेर पडली आहे. गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेने असे असंख्य धाव झेलले आहेत यापुढेही समोरून वार केलेत तर समोरून लढू आणि पाठीमागून खजीर खुपसणार असाल, तर त्याच पध्दतीने पाठीमागे वळून तुमचा कोथळा काढू असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केला. पक्षातर्फे आयोजित शिवगर्जना अभियानातर्गत सातारा येथील शाहू कलामंदिरात घेतलेल्या शिवनिर्धार मेळाव्यात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग बेकायदा ठरवला. निवडणूक आयोग कसा असावा यासाठी तीन लोकाची समिती नेमली. या निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. २०२४ मध्ये या चुना आयोगाला चुना नाही मळत बसायला लावला तर बघा मी पुन्हा सागतो. दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये भगव्याचेच राज्य येणार, असा जबरदस्त विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. जी शिवसेना सपली असे म्हणतात. ती आम्ही आज रस्त्यावर पाहिली ही जी थांबलेली शक्ती आहे. ऊर्जा आहे. ती धगधगते अग्निकुंड आहे. त्या शिवसेनेचे निवडणूक आयोग काय करणार आणि ही शिवसेना त्या शिधा मिध्यांना कशी मिळणार असा जळजळीत सवाल खासदार राऊत यांनी केला. मी आज ऐतिहासिक आणि अत्यंत क्रांतीकारी अशा सातारा शहरामध्ये आहे. क्रांती काय असते ते महाराष्ट्राला स्वातंत्र्य लढयापासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत साताऱ्याने दाखवून दिले आहे  बलाढ्य शक्तिविरुध्द पत्री सरकार चालवणारे हे सातारा आहे. इथला अजिंक्यतारा मी मघाशी पाहिला शिवसेनेची परिस्थिती अजिक्यता यासारखीच आहे. या अजिंक्यताऱ्याने असे अनेक गद्दार पाहिले आहेत. अनेक घाव या अजिक्यताऱ्याने छातीवर आणि पाठीवर झेलले आहेत. शिवसेनेनेही गेल्या ५० ५५ वर्षात असे अनेक घाव छातीवर झेलले. तसे पाठीवरही झेलले आहेत शिवसेनाप्रमुख म्हणायचे, की माझ्या छातीवर व पाठीवर इतके घाव झाले आहेत. की आता पाठीवर घाव झेलायला जागा उरलेली नाही हे सगळे घाव स्वकियांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून ही शिवसेना बाळासाहेबानी निर्माण केली. या शिवसेनेच्या नशिबातही गेल्या पन्नास वर्षात स्वकियांकडून हे गद्दारीचे घाव प्रापत्त झाले पण यातूनही शिवसेना उभी राहिली आहे. अनेकजण सोडून गेले. तरी आजदेखील ही शिवसेना उभी आहे. या शिवसेनेची बस कधी रिकामी राहिली नाही आपली बस फुल्ल आहे. एखाद्या स्टॉपला बस थांबल्यावर पुढून पन्नास लोक उतरते, तर मागून शंभर चढतातच. शिवसेनेचा सिनेमा कायम हाऊसफुल्ल हे जाऊन सांगा त्या गद्दाराना. असे आसूड त्यांनी ओढले नारायण राणे, एकनाथ शिंदे, भावना गवळी, प्रताप सरनाईक अशा अनेकांवर ईडीच्या कारवाया सुरू झाल्यानतर ईडी- सीबीआयला घाबरून हे डरपोक लोक पळून गेले. तिकडे गेल्यावर त्याना लगेच वॉशिंग मशिनमध्ये टाकले नारायण राणेला तुरुगात टाकल्याशिवाय राहणार नाही असे ते सोमय्या म्हणत होते. त्यांच्या घोटाळ्यांचे काय झाले ते त्यांना विचारा, त्यानंतर ईडीवाले माझ्याकडे आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यामध्ये, कॉंग्रेस राष्ट्रवादीला एकत्र आणण्यामध्ये हा संजय राऊत पुढे होता. भाजपला रोखण्यामध्ये हा संजय राऊत पुढे होता. टाका याला तुरूंगात त्यांना वाटले मी गुडघे टेकेन, मी शरण येईन मी सांगितले. मला अटक करताय तर संध्याकाळी करू नका. आताच करा. पण मी जर या इतराप्रमाणे रडत राहिलो असतो. घाबरलो असतो, तर बाळासाहेबाचे नाव घ्यायची माझी लायकी नव्हती ज्या पक्षाने मला मानसन्मान दिला. प्रतिष्ठा दिली. त्या पक्षासाठी तुरुंगात जावे लागले तर मी उपकार करत नाही. जे त्याची इतिहासात गद्दार म्हणून नोंद होईल आणि आमच्यासारख्या निष्ठावताना तो शिक्का लावून समाजात फिरता आले नसते आपण हसत हसत तुरुगात गेलो, असे सांगून, आज ही शिवसेना तुमच्यासारख्या निष्ठावंतांच्या बळावर उभी आहे तिचा कोणी बालही बाळा करू शकत नाही. बाळासाहेबांनी ज्या विचाराने शिवसेना काढली. ती कुणाला पळवून नेऊ देणार नाही असे त्यांनी ठणकावले पळून गेले. आज जे लोक महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जात आहेत. महाराष्ट्रात नवीन उद्योग येऊ देत नाहीत.  म्हणजे महाराष्ट्राच्या मुलानी बेरोजगार रहायचे, उपाशी मरायचे. भीक मागायची. याविरुध्द शिवसेना आवाज उठवेल, रस्त्यावर उतरेल, जाय विचारेल, प्रसंगी छातीवर गोळ्या झेलेत आणि महाराष्ट्र व मराठी माणसाला वाचवेल म्हणून शिवसेना खतम करायची ही कारस्थाने आहेत. पण तुम्ही कितीही कारस्थाने करा. ही शिवसेना पुन्हा पुन्हा जन्म घेईल. पुन्हा पुन्हा उभी राहील

पूर्वी छत्रपती पेशव्याना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत सातारामध्ये हे काही महाराष्ट्राला मान्य नाही असा टोला त्यांनी लगावला ही स्वाभिमान्यांची गादी आहे. स्वाभिमानासाठी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्याग केला ब्रिटिशांसमोर ते झुकले नाहीत. आणि त्याच्या वंशजांनी जी भाजपसोबत जी त डजोड केली. ती छत्रपती शिवाजी महाराजाच्या जाज्ज्वल्य, ज्वलत अशा इतिहासाला कदापि मान्य होणार नाही.यावेळी पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबुराव माने, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, गणेश अहिवळे हर्षद कदम, संजय भोसले, अमोल आवळे, अजित यादव, सभाजीराव जगताप, दत्ता नलावडे, माजी जिल्हाप्रमुख हणमत चवरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त