सातारचे शिवभक्त दोन नेत्याच्या "इगो"वॉर मध्ये अडकले गेलेत ....आ. शिवेंद्रराजे

सातारा: एकाने भिंतीवर चित्र रंगवलं म्हणून दुसऱ्याने स्मारकाचा विषय काढला आहे. दुर्दैवाने या दोन्ही नेत्यांमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुरफटले गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबत कोणतीही तडजोड कोणीही करणार नाही. त्यामुळे पालकमंत्री आणि उदयनराजे या दोन्ही नेत्यांनी सुरू असलेला ‘इगो वॉर’ थांबवावा अशी कानउघाडणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

साताऱ्यात सध्या सुरू असलेल्या स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या आयलॅन्ड आणि शिवतीर्थ या विषयावर आ. शिवेंद्रराजे भोसले माध्यमांशी बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांची कान उघडणी केली आहे. तसेच थेट उदयनराजे भोसले यांच्यावरही टीकास्त्र सोडले

उदयनराजें स्वतः च्याच विश्वात : आ. शिवेंद्रराजे भोसले
माझं स्पष्ट मत आहे, दोन्ही नेत्यांच्यात इगो वाॅर सुरू आहे. उदयनराजेंनी भिंतींवर पेंटीग काढलं, ते थांबवलं मग त्यांनी रेटून काढलं. तेव्हा दोघांनी इगो वाॅर थांबवावा. माझं तर स्पष्ट मत आहे पालकमंत्र्यांनीच याबाबतीत सामंजसपणा दाखवावा. कारण उदयनराजेंशी बोलण्यात काही अर्थच नाही, उदयनराजे हे स्वतःच्याच विश्वात सतत असल्यामुळे त्यांच्याकडून भूमिका घेतली जाईल अस वाटत नाही. मंत्र्यांनीच सामंजसपणा दाखवून शिवभक्तांचा भावनेचा विचार करून हे स्मारक पोवई नाका येथे न करता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी करावे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल आम्हांला आदर आहे, आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त