फलटण मध्ये दहावी, अकरावीच्या दोन मुलींवर पिटी शिक्षकाचा अत्याचार
Satara News Team
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दहावी आणि अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींवर एका पिटी शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली असून, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित पिटी शिक्षकावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल झाला होता. या तक्रार अर्जाची पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पिटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याचबरोबर इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर स्वत:च्या कारमधून पीडित मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करत त्याने वाटेतच मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेची माहिती फलटण तालुक्यात पसरताच तीव्र संतापाची लाट उसळली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची फिर्याद महिला पोलिस काॅन्स्टेबल यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत संबंधित पिटी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 12th Feb 2024 12:21 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 12th Feb 2024 12:21 pm












