हाताचे बोट कापून थेट फडणवीसांना पाठवलेल्या प्रकरणात मंत्री शंभुराज देसाईंचे नाव ?

सातारा :  सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या २० दिवसांनंतरही पोलिसांकडून चौकशीत दिरंगाई केली जात असल्याने नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी ऑन कॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरून प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली असून दोघांकडून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची कां उघडणी करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपले बोट छाटून त्याचा व्हिडीओ तयार करत तो थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविला आहे. या व्हिडिओत ननावरे यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचाच उल्लेख केला आहे. उल्हासनगरमध्ये आत्महत्या केलेल्या नंदकुमार ननावरे व वहिनीच्या प्रकरणाची २० दिवस उलटून देखील चौकशी तसेच पुढील तपास हा जलद गतीने केला जात नसल्याने आता दररोज शरीराचा एक एक अवयव तोडून तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार असल्याचा इशारा धनंजय ननावरे यांनी दिला आहे.


एकंदरीत फलटण तालुक्यातील उल्हासनगरमध्ये ननावरे दांपत्याने केलेली आत्महत्येवरून पोलिसानी जरी चार ते पाच जणांना अटक केली आहे. तरी पुढील तपास गतीने केला जात नसल्यामुळे धनंजय ननावरे यांनी आपल्या हाताची बोट चाटून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविली असल्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणावरून देसाईंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री काय कारवाई करणार? हे पहावे लागणार आहे.


मंत्रालयात बंद दाराआड 45 मिनिटे नेमकं काय घडलं ?

मुंबईत मंत्रालयात शुक्रवारी कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. दोघांच्यात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्यात मंत्रालयात बंद खोलीत तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही बोलवण्यात आलं. त्याठिकाणी मंत्री देसाईंना या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी जाबही विचारला. तसेच सर्वांसमोर देसाईंना जवळपास अर्धा तास चांगलेच झापले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावरून शंभूराज देसाईंची कानउघडणी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला