मोठी ब्रेकिंग शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघातात निधन
- Satara News Team
- Sun 14th Aug 2022 03:23 am
- बातमी शेयर करा
रायगडमध्ये विनायक मेटेंच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात विनायक मेटेंचे निधन झाले
रायगडमध्ये विनायक मेटेंच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात विनायक मेटेंचे निधन झाले आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यावेळी विनायक मेटेंसह त्यांच्या मुलगा देखील होता. मेटेंचा मुलगा गाडी चालवत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा मुलगा देखील किरकोळ जखमी झाला आहे. त्यांच्यावर एम जी एम रूग्णालयात उपचार सुरु होते. विनायक मेटेंची अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दरेकर हॉस्पिटलमध्ये रवाना झाले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
????????????मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
????????️????अपघातानंतर एक तासभर कुणाचीही मदत नाही
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला त्यावेळी त्यांनीसांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे.मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.
????????कोण होते विनायक मेटे
➖विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
➖मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
➖मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
➖अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
➖बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
➖सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य
स्थानिक बातम्या
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब 'मॅप्रोवर कारवाई झालीच नाही ओ'?
- Sun 14th Aug 2022 03:23 am
हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच पेशंटचा मृत्यू झाला असल्याचा डॉ. भूषण पाटील यांचा दावा
- Sun 14th Aug 2022 03:23 am
सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील
- Sun 14th Aug 2022 03:23 am
अंगापुरच्या मनमानी उपसरपंचावर अविश्वासचा ठराव
- Sun 14th Aug 2022 03:23 am
किरकोळ कारणावरून पत्नीचा नवऱ्याने दाबला गळा, बायकोचा झाला मृत्यू
- Sun 14th Aug 2022 03:23 am
राज्यातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा
- Sun 14th Aug 2022 03:23 am
संबंधित बातम्या
-
अंगापुरच्या मनमानी उपसरपंचावर अविश्वासचा ठराव
- Sun 14th Aug 2022 03:23 am
-
राज्यातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा
- Sun 14th Aug 2022 03:23 am
-
फलटणचे आमदार श्री सचिन पाटील फलटण शहराच्या विकासाच्या ॲक्शन मोडवर
- Sun 14th Aug 2022 03:23 am
-
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
- Sun 14th Aug 2022 03:23 am
-
मंत्री मकरंद पाटील ठेकेदाराबरोबर पोहचले नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात .
- Sun 14th Aug 2022 03:23 am
-
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Sun 14th Aug 2022 03:23 am
-
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्या सोबत : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
- Sun 14th Aug 2022 03:23 am
-
उंब्रज येथुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा,
- Sun 14th Aug 2022 03:23 am