गोंदवले ग्रामप्रशासन कोमात ; रोगराई मात्र जोमात
उघड्या गटारांतील डासांच्या फैलावाने साथीच्या रोगांची शक्यता
एकनाथ वाघमोडे- Mon 18th Jul 2022 11:04 am
- बातमी शेयर करा
गोंदवले : गोंदवले बु। ता.माण या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्न ग्रामप्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे कारण गावागावात असलेल्या उघड्या गटारांच्या माध्यमातून सांडपाण्यातून निर्माण झालेल्या डासांच्या फैलावाने गावात दाट रोगराई पसरण्याची शक्यता व रोगराईचा फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रश्नी कोमात असलेले ग्रामप्रशासन जागे होऊन जोमात असलेल्या रोगराईला थोपवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
माण तालुक्यासह सर्वत्र पावसाची मुसळधार नसली तरी रिपरिप सुरू आहे. त्यामुळे गावागावात साठलेल्या गटारातील सांडपाण्यातून निर्माण झालेल्या डासांच्या फैलावाने रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सातारा पंढरपूर रोडवर असलेल्या गोंदवले नगरीतील असणारी गटारे सताड उघडी पडलेली आहेत त्यामुळे गटाराच्या माध्यमातून वाहून जाणारे सांडपाणी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या डासांच्या फैलावाने साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे त्यामुळे या आजारांना बळी पडण्याची वेळ गावातील नागरिकांवर आलेली आहे.त्याचबरोबर मुख्य रस्त्यालाही अर्धवट कामामुळे गटाराचेच स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. मुख्य रस्ता असल्याने रस्त्यावर असणारी वाहनांची रहदारी आणि वरून पडणाऱ्या पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे साठलेल्या पाण्यातून देखील डासांची उत्पत्ती होत असून या डासांच्या माध्यमातून कावीळ, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना आयतेच आमंत्रण मिळत आहे.
या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करणारे ग्रामप्रशासन आता तरी या बाबीकडे लक्ष देत गटारांची दुरुस्ती करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून साथीच्या रोगांपासून गावाला वाचवणार का ? गावात साथीचे रोग निवारणात्मक औषध फवारणी करणार का? हा सवाल गावकरी करत आहेत.
गावांत डास मारण्यासाठी औषध फवारणी आणि रोगराई आटोक्यात आणण्यासाठी उघड्या गटारांचा बंदोबस्त करण्याची मागणी गोंदवलेकर ग्रामस्थ करत आहेत.
gondavle
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 18th Jul 2022 11:04 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 18th Jul 2022 11:04 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 18th Jul 2022 11:04 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 18th Jul 2022 11:04 am
संबंधित बातम्या
-
उन्हाळ्याचा वाढता प्रकोप: 'उष्माघात' टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध!
- Mon 18th Jul 2022 11:04 am
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Mon 18th Jul 2022 11:04 am
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Mon 18th Jul 2022 11:04 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Mon 18th Jul 2022 11:04 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Mon 18th Jul 2022 11:04 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Mon 18th Jul 2022 11:04 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Mon 18th Jul 2022 11:04 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Mon 18th Jul 2022 11:04 am













