जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
Satara News Team
- Sun 1st Jun 2025 09:43 am
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील तीन रुग्ण कराड येथे, तर एक महिला रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती. संबंधित ७० वर्षीय वृद्धेवर गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान शनिवारी दुपारी त्या वृद्धेचा मृत्यू झाला. संबंधित महिलेला काही वर्षांपूर्वीसुद्धा कोरोना झाला होता. दुसऱ्यांदा त्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्या महिलेला डायबेटिस आणि फुफ्फुसाचा आजारही होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी सांगितले.
कऱाड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील सध्याच्या डॉक्टरांनी कोरोना काळामध्ये चांगले काम केले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेचा डॉक्टरांना अनुभव आहे. नागरिकांनी लसीकरण केलेले असल्यामुळे तसेच सध्या नागरिकांमधली प्रतिकारशक्तीही वाढलेली आहे. त्यामुळे भीती बाळगू नये. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. पूर्वी कोरोनामध्ये आपण ज्याप्रमाणे काळजी घेत होतो. त्याप्रमाणे काळजी घ्यावी. मास्क वापरावा, साबणाने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहनही आरोग्य विभाकडून करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 1st Jun 2025 09:43 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 1st Jun 2025 09:43 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 1st Jun 2025 09:43 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 1st Jun 2025 09:43 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 1st Jun 2025 09:43 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 1st Jun 2025 09:43 am
संबंधित बातम्या
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Sun 1st Jun 2025 09:43 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Sun 1st Jun 2025 09:43 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Sun 1st Jun 2025 09:43 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Sun 1st Jun 2025 09:43 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Sun 1st Jun 2025 09:43 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Sun 1st Jun 2025 09:43 am
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Sun 1st Jun 2025 09:43 am
-
जिल्ह्यात डेंगू पाठोपाठ हत्तीरोगाचे थैमान! 47 रुग्ण सक्रिय
- Sun 1st Jun 2025 09:43 am













