विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवसायिक ज्ञानाचा अनुभव आवश्यक : प्राचार्य साळुंखे

दहिवडी कॉलेज मधील व्यापार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दहिवडी : दहिवडी कॉलेज मध्ये दि. १४ रोजीबी.कॉम. व बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या व्यापार मेळाव्याचे उद्घाटन दहिवडीतील युवा उद्योजक लखन बरकडे , प्राचार्य एस. टी.साळुंखे,  उपप्राचार्य ए. एन दडस ,विभाग प्रमुख एम. एन म्हेत्रे, कार्यक्रम आयोजक कदम एस.के, या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले.
    या व्यापार मेळाव्यामध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी चायनीज बिर्याणी, उत्तप्पा, डोसा, पाणीपुरी,भेळ, थंडपेय अशी वेगवेगळ्या प्रकारचे १३ स्टॉल लावले होते. या स्टॉल मधून जवळपास २२ ते २५ हजार रु. ची व्यवसायिक उलाढाल झाली . कॉलेजमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेत आपल्या व्यवसायिक ज्ञानाचा अनुभव घेतला. वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्यापार मेळाव्यास दहिवडी कॉलेजमधील जूनियर व सीनियर   सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी  भरघोस असा प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी खाऊच्या स्टॉलवर खाण्यासाठी गर्दी केली. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला