राज्यात शिंदे गटाला ग्रामपंचायतीत पहिला विजय : तब्बल 22 वर्षांनी उत्तर तांबवेत सत्तांतर
सकलेन मुलाणी
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
- बातमी शेयर करा

तांबवे : राज्यात शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत निवडणूक सत्तांतर घडवत जिंकली आहे. आ. शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघातील कराड तालुक्यातील उत्तर तांबवे या ग्रामपंचायतीत तब्बल 22 वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवत शिंदे गटाने पहिला एक विजय मिळवला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान व शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात हा विजय मिळाला आहे. उत्तर तांबवे येथे सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल आणि जय हनुमान ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. युवा उद्योजक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्राम विकास पॅनेलने 4-3 असे सत्तांतर करत विजय मिळवला. उत्तर तांबवे येथील ग्रामपंचायत सत्ताधारी पाटणकर गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर आमदार शंभूराजे देसाई व रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने 4 जागा मिळवत सत्तांतर घडवले.ग्रामपंचायत निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे - सर्व साधारण गट- विजयी -रोहित चव्हाण 98), पराभूत- सागर चव्हाण (89), विजयी -जयसिंग पाटील (120), पराभूत- प्रकाश पाटील (84), विजयी - शशिकांत चव्हाण (103), पराभूत -अजय पवार (57), अनुसूचित जाती स्त्री राखीव - विजयी- विद्या साठे (94), पराभूत -अश्विनी कारंडे (92), सर्वसाधारण स्त्री गट -विजयी - रूपाली पवार (116), पराभूत - जयश्री पवार (93), विजयी-बानुबी मुल्ला (107), पराभूत- बेबी मुल्ला (97) विजयी - भारती चव्हाण (102), पराभूत - वनिता चव्हाण (58)
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
संबंधित बातम्या
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Fri 5th Aug 2022 12:41 pm
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Fri 5th Aug 2022 12:41 pm