स्पर्धा परिक्षेतील यश हे चिरकाल टिकणारे - प्रदिप कणसे
सतीश जाधव
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : स्पर्धा परीक्षेतील यश हे चिरकाल टिकणारे, व इतरांना प्रेरणादायी ठरणारे असते, असे मत औंध शिक्षण मंडळाचे सचिव प्रदिप कणसे यांनी व्यक्त केले.
अंगापूर वंदन येथील न्यू इंग्लीश स्कूल व नारायण गुजाबा कणसे ज्युनियर कॉलेज येथे स्पर्धा परिक्षांत यश मिळविलेल्या गावातील युवक-युवतींच्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षण व त्यातून मिळणारे यश हे व्यक्तिमत्त्वाच्या बदलाचे माध्यम आहे. येणारी तरुण पिढी ही जिद्द, सातत्य, महत्त्वाकांक्षा व प्रामाणिक कष्ट घेऊन यशस्वी होत आहे. या सर्वांचे यश हे केवळ एकट्याचे नसून त्याबद्दल संपूर्ण कुटुंबाला व गावाला याचा गर्व व अभिमान वाटतो.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांपैकी नीलम मोरे, अभियंता म्हाडा, कैलास हजारे, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अंजली सचिन माळी हिची भारतीय अंतराळ संशोधन व प्रौद्योगिकी संस्थान तिरुवंतपुरम (केरळ) आयआयएसटी या नामांकित संस्थेत एरोस्पेस इंजिनिअरिंग या शाखेत निवड झालेबद्दल या सर्वांचा संयुक्त सत्कार समारंभ विद्यालयात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट घेऊन विद्यालयाचे व आपल्या मातृभूमीचे व कुटुंबाचे नाव उज्वल करावे यातूनच समाजसेवा घडेल व भविष्यातील विद्यार्थी योग्य मार्गावर यशस्वी होतील, असे मत मुख्याध्यापक दीपक ढाणे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमास ओंकार देशमुख, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार डी.एस्. शिर्के यांनी मानले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 26th Jul 2023 12:20 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 26th Jul 2023 12:20 pm













