कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई
- कोमल वाघ-पवार
- Thu 15th Dec 2022 11:24 am
- बातमी शेयर करा
सातारा : कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करा. ज्या ठिकाणी काम करणे शक्य आहे तेथील काम आठ दिवसात पूर्ण करावे अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग व सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.
यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन करीर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधानसचिव मिलिंद म्हैसकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलिस अधिक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडे, एल ॲण्ड टी कंपनीचे परेश वारुळे, रविंद्र मोहिते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीकरण आवश्यक आहे तेथे डांबरीकरणातून दुरुस्ती करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, विहे घाटातील डांबरीकरण, मल्हार पेठेतील क्राँक्रीटीकरण, नवसरी येथे डांबरीकरण, नाडे, अडूळ, म्हावशी येथील क्राँक्रीटीकरणाचे काम आठ दिवसाच्या आत सुरु करुन तातडीने पूर्ण करावे. तसेच पाटण ते संगमनगर धक्का व संगमनगर धक्का ते घाट माथा या रस्त्याचे काम डांबरीकरणातून तातडीने पूर्ण करुन महामार्ग वाहतुक योग्य करावा. तसेच या रस्त्याच्या निविदेची फेर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन 6 महिन्यांच्या आत काम सुरु करावे. एल ॲण्ड टी कंपनीने या रस्ता कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन गरज पडेल तिथे स्थानिकांच्या मदतीने काम मार्गी लावावे. हे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
यावेळी बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एल ॲण्ड टी कंपनीने तातडीने काम सुरु करुन रस्ता वाहतूक योग्य करण्याचे मान्य केले. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही आजच सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबतचा आढावा
सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाला हस्तांतरीत करण्याविषयी पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी समन्वयाने चर्चा करुन याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा यांना लागणारी आवश्यक जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी योवळी केल्या.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कार्यतत्परतापालकमंत्री श्री. देसाई यांचे काका कै. सुभाषराव तानाजीराव देसाई यांचे निधन झाल्यामुळे मंत्री महोदयांचे सर्व कार्यक्रम तीन दिवस रद्द करण्यात आले आहेत. कुटुंबातील या दु:खद प्रसंगीही पालकमंत्री श्री. देसाई यांची कार्यतत्परता दिसून आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, पाटण तालुक्यातील महत्त्वाचे व नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी निगडीत महत्त्वाचे प्रश्न याविषयी पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज सातारा येथील निवासस्थानी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठका घेऊन हे प्रश्न मार्गी लावले. कुटुंबातील दु:खद प्रसंगातही कर्तव्य भावनेने प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असणारे पालकमंत्री या निमित्ताने पहायला मिळाले. कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे संभाळून तितक्याच आत्मियतेने नागरिकांचे व राज्याचे प्रश्न सोडविणारे असे हे नेतृत्व विरळच म्हणावे लागेल.
स्थानिक बातम्या
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Thu 15th Dec 2022 11:24 am
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Thu 15th Dec 2022 11:24 am
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Thu 15th Dec 2022 11:24 am
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Thu 15th Dec 2022 11:24 am
मंत्री मकरंद पाटील ठेकेदाराबरोबर पोहचले नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात .
- Thu 15th Dec 2022 11:24 am
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Thu 15th Dec 2022 11:24 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Dec 2022 11:24 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Dec 2022 11:24 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 15th Dec 2022 11:24 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 15th Dec 2022 11:24 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 15th Dec 2022 11:24 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 15th Dec 2022 11:24 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 15th Dec 2022 11:24 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 15th Dec 2022 11:24 am