केंद्र शाळा हुमगावचे पदवीधर शिक्षक महादेव शंकर राक्षे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

भिलार :  हुमगाव (ता. जावली) केंद्र शाळेचे  पदवीधर शिक्षक महादेव शंकर राक्षे यांना नुकताच तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला.

मेढा (ता. जावली) येथे झालेल्या पुरस्कार वितरण विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार श्री. राक्षे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास माजी सभापती अरुणा शिर्के, कांतिभाई देशमुख, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष दत्ता पवार, गटविकास अधिकारी मनोज भोसले, डाएटचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, गटशिक्षणाधिकारी संजय
धुमाळ, साहित्यिक नीलेश महिगावकर, दत्तात्रय पाटें, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंद्रकांत कर्णे, अरविंद दळवी, विजय सपकाळ, भास्कर धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री महादेव शंकर राक्षे यांनी आपल्या सेवा काळात शिष्यवृत्ती , क्रीडा प्रबोधिनी, शैक्षणिक उठाव अशा विविध विभागात चौफेर उठावदार काम केले असून याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

श्री राक्षे यांचे या पुरस्काराबद्दल शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके, मच्छिंद्र मुळीक, मीलन मुळे, शिक्षक बँकेचे माजी संचालक गणेश तोडकर, शिक्षक बँकेचे संचालक विजय शिर्के, शंकर जांभळे, संभाजी देशमुख,  शंकर बिरामणे, आर. टी. दळवी,अमोल जगताप, रामचंद्र भिलारे, राजेंद्र बोराटे, संदीप फरांदे, रविंद्र सोनटक्के, युवराज कुडाळकर, विजय जाधव तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला