महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज आयोग जाहीर करणार
- Satara News Team
- Fri 16th Aug 2024 09:20 am
- बातमी शेयर करा
मुंबई : महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.
कोणत्या राज्यात किती जागा
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये बराच काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. त्यात जम्मूमध्ये 43 विधानसभा जागा तर काश्मीरमधील 47 विधानसभा जागा आहेत. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या.
स्थानिक बातम्या
सन 2019 पूर्वीच्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बंधनकारक
- Fri 16th Aug 2024 09:20 am
केसांबरोबर खिशाला ही लागणार कात्री
- Fri 16th Aug 2024 09:20 am
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Fri 16th Aug 2024 09:20 am
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Fri 16th Aug 2024 09:20 am
करंजे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
- Fri 16th Aug 2024 09:20 am
पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ च्या रुग्णवाहिकेचे आमदार घोरपडेंच्या हस्ते लोकार्पण
- Fri 16th Aug 2024 09:20 am
संबंधित बातम्या
-
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Fri 16th Aug 2024 09:20 am
-
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Fri 16th Aug 2024 09:20 am
-
अंगापुरच्या मनमानी उपसरपंचावर अविश्वासचा ठराव
- Fri 16th Aug 2024 09:20 am
-
राज्यातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा
- Fri 16th Aug 2024 09:20 am
-
फलटणचे आमदार श्री सचिन पाटील फलटण शहराच्या विकासाच्या ॲक्शन मोडवर
- Fri 16th Aug 2024 09:20 am
-
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
- Fri 16th Aug 2024 09:20 am
-
मंत्री मकरंद पाटील ठेकेदाराबरोबर पोहचले नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात .
- Fri 16th Aug 2024 09:20 am
-
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Fri 16th Aug 2024 09:20 am