इंस्टाग्राम वरील ओळखीतून सांगलीतील युवतीवर कराड येथे अत्याचार
Satara News Team
- Wed 29th May 2024 11:52 am
- बातमी शेयर करा
कराड : आज-काल इंस्टाग्राम फेसबुक त्याचप्रमाणे सोशल मीडियावर तरुणांची बरीच संख्या वाढत चालले यात अनेक योग्य गोष्टी कोणत्याही अमिषाला बळी पडण्याचे प्रकार घडत आहे असाच एक प्रकार कराड येथे घडला असून इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडलेला असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे.
पीडित युवतीने याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आसुन. मानस भास्कर देसाई (रा. नम्रता रेसिडेन्सी, कराड) या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील एका युवतीची कराड शहरातील मानस देसाई या युवकाशी मार्च 2021 मध्ये इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. फेब्रुवारी 2022 पासून मानस देसाई हा संबंधित युवतीला भेटत होता. त्याने तिला विवाह करणार असल्याचे अमिष दाखवले.
विवाह करणार असल्याची खात्री देत त्याने संबंधित युवतीला वेळोवेळी कराडात बोलावून ठिकठिकाणी वारंवार तिच्यावर अत्याचार केला. या कालावधीत युवतीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 4 मे 2024 पर्यंत मानस देसाई हा त्या यत्ततीला लग्नाबाबत टाळाटाळ करीत होता.
अखेर त्या युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मानस देसाई याने, आपण दोघे आधी करिअरचा विचार करु, नंतर विवाहाचे बघू, असे म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही युवतीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे मानस देसाई याने तिला शिवीगाळ दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर पीडित युवतीने याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर मानस देसाई याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिली.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 29th May 2024 11:52 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 29th May 2024 11:52 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 29th May 2024 11:52 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 29th May 2024 11:52 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 29th May 2024 11:52 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 29th May 2024 11:52 am
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 29th May 2024 11:52 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 29th May 2024 11:52 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Wed 29th May 2024 11:52 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Wed 29th May 2024 11:52 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Wed 29th May 2024 11:52 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 29th May 2024 11:52 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 29th May 2024 11:52 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 29th May 2024 11:52 am












