वर्णे मुस्लिम समाजाचे आंदोलन स्थगित ! योग्य ती कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आंदोलन करणार !!

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ने,ता.सातारा येथील ग्रामपंचायतीने अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना माईकवरून अजान बंदीचा ठराव विरोधार्थ निषेध करण्यात आला असून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.५ दिवस पूर्ण झाल्यानंतर  प्रशासनाने आंदोलनकर्त्याशी चर्चा सकारात्मक केल्याने आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.मात्र, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतीने एका महिन्यात कारवाई करावी.अन्यथा,थेट मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे.
     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ग) चे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, राज्य सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, मुस्लिम आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष सुरज मुलाणी, मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक जामदार,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे आदींच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होते. चालु असलेल्या आंदोलनाची धार वाढतच होती. अनेकांनी भेटी देऊन जाहीर पाठिंबा दिला होता.५ व्या दिवशीही सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ, उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर, फारुख पटणी, अनिल वीर,ऍड.विजय वाघमारे आदींनी भेट देऊन कायद्याप्रमाणे शहर-ग्रामीणमध्ये जे नियम असतील ते सर्व समाज घटकासाठी समानच असावेत. अशा मागणीचा पुनरुच्चारही  केला होता.आंदोलनस्थळी सकाळी ६ वा.फजरची नमाज, दुपारी १.३० वा.जोहरची नमाज, सायंकाळी ५ वा.असरची नमाज व रात्रौ ८ वा. ईशाची नमाजही  सुरू होता. ग्रामपंचायत बॉडी तात्काळ अपात्र करावी.सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर ठराव केल्याप्रकरणी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत.ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला जातीय द्वेषापोटी भयभीत करण्याच्या हेतूने स्पीकर वरून अजान देण्यास बंदीच्या ठरावाप्रमाणे संपूर्ण गावातच स्पीकर बंदी लागू करावी.या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधितांना देण्यात आली होती. संबंधित पोलिसाबरोबर चर्चा करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी येऊन वाढता पाठींबा मिळत होता.त्यामुळे वरिष्ठांनी संबंधितांशी चर्चा केली.जोतोपर्यंत विशिष्ट समाजावर ग्रामपंचायतीने केलेला ठराव रुध्द होत नाही.तोपर्यंत गावातील सर्व समाजास एकच न्याय राहील.अर्थात,संपूर्ण गावातच स्पीकर बंदी राहणार आहे.

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतांना मान्यवर.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त