महामार्गावरील पुलाखाली गटार गंगा
SATISH JADHAV
- Fri 7th Jun 2024 11:17 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : मान्सूनपूर्व पावसामुळे महामार्गाच्या पुलाखालील रस्त्यावर पाणी साचल्याने प्रवाशांना येजा करताना त्रास होत आहे. पुणे बंगलोर महामार्गावरील सातारा तालुक्यातील भरतगाव आणि भरतगाववाडी येथे असलेल्या पुलाखाली पावसाचे पाणी साठून राहिल्याने येथे गटरगंगा तयार झाली आहे. सेवा रस्त्याला गटर तुंबल्याने पुलाखाली साठलेले पाणी बाहेर जाण्यास अडचण निर्माण झाली असून महामार्गाच्या प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे असे नागरिकांतून चर्चा होत आहे. पुलाखालील व सेवा रस्त्याची समस्या दूर करण्यासाठी नागरिकांची मागणी होत आहे. या दोन्ही बाजूच्या गावांचा पुलाखालून सेवा रस्त्याने प्रवास सतत चालू असतो श. दरवर्षी पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साठवून राहत असल्याने रस्ता जलमय होतो असतो. वाहनधारकांना यातून मार्ग काढावा लागला तरी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि पादचारांची मोठी गैरसोय होत असते. सातारा व इतर शहराकडे आणि महामार्गावरती जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने नागरिकांची तारांबळ उडत असते तरी याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
स्थानिक बातम्या
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 7th Jun 2024 11:17 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 7th Jun 2024 11:17 am
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 7th Jun 2024 11:17 am
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 7th Jun 2024 11:17 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 7th Jun 2024 11:17 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 7th Jun 2024 11:17 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 7th Jun 2024 11:17 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 7th Jun 2024 11:17 am










