शिव आरोग्य सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक पार

सातारा : पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत चालण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी शिव आरोग्य सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक साताऱ्यातील विश्रामगृहात पार पडली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक पार पडली.

  या बैठकीमध्ये जिल्ह्यामधील नवीन इच्छुक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या निवडीची पत्र देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वय जितेंद्र दादा सपकाळ यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यानंतर जिल्ह्यामधील शिवा आरोग्य सेनेच्या कामाचा आढावा आरोग्य सेनेबाबत मार्गदर्शन तसेच आरोग्य सेनेचे कामकाज वाढीबाबत प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शनपर भाषणे होऊन यावर चर्चा करण्यात आली.

 यावेळी या बैठकीस सातारा जिल्हा समन्वयक निमिश शहा, सातारा जिल्हा सचिव फलटण मान खटाव शैलेंद्र नलवडे, सातारा उपजिल्हा समन्वयक जावली वाई विधानसभा शंकर सनस, जावळी तालुका समन्वयक प्रकाश गोळे, सातारा तालुका समन्वयक मंगेश जाधव, कराड उत्तर समन्वयक आनंदा शिंदे, कराड दक्षिण समन्वयक संतोष पवार, सातारा शहर समन्वयक सुमित नाईक, सातारा शहर समन्वयक मारुती वाघमारे, फलटण उपशहर समन्वयक प्रवीण पवार, शिवसेनेचे सातारा उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, शहर संघटक प्रणव सावंत, महाबळेश्वर शहर समन्वयक अमोल साळुंखे, नवनियुक्त दत्तात्रेय दुंदले, किरण राजगे, जगन्नाथ शिर्के, अक्षय रांजणे, नितीन मेंगळे, सुनील बेलोशे, संकेत जुनघरे, राजेंद्र बरकडे, रोहित पानसकर, विकास गायकवाड, सर्जेराव रेदालकर, नितीन खेडेकर, राजेंद्र शिंदे, राहुल जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 

बैठक यशस्वी करण्यासाठी शहर समन्वयक सुमित नाईक, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी प्रयत्न केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त