चांद्रयान – ३ च्या माध्यमातून साताराच्या कूपर कंपनीचा क्रॅकशाफ्ट चंद्रावर..खा. उदयनराजे यांच्याकडून कुपर यांचे अभिनंदन
प्रकाश शिंदे - Sun 27th Aug 2023 09:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : चांद्रयान ३ मोहिमेमध्ये साताऱ्यातील जगप्रसिद्ध कूपर उद्योग कंपनीचा क्रॅकशाफ्ट वापरण्यात आलेला, आहे ही गोष्ट सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्त उद्योगपती फारूख कूपर यांचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनंदन केले.
कूपर कंपनीने आजपर्यंत अनेक उपकरणे तयार करून आपल्या कार्याचा डंका जगभर वाजवला आणि यापुढेही याच पद्धतीने कंपनीची वाटचाल अखंडपणे कार्यरत राहील याची खात्री आहे, असे यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते.
इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स हे एक इस्रोचे द्रव प्रणोदन प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे, ज्यामध्ये शुद्ध हायड्रोजन गॅसची आवश्यकता असते. या हायड्रोजन गॅसचा पुरवठा करत आसलेली मे. आंध्र शुगर्स लिमिटेड, सागगोंडा या कंपनीला सदर हायड्रोजन गॅसच्या उत्पादनासाठी ३ कटिंग- एज स्टॅण्डेड हाय – प्रेशर कॉम्प्रेसरची सहाय्यता लागते. हे ३ कटिंग- एज स्टॅण्डेड हायप्रेशर कॉम्प्रेसर मशीन हे मे. बर्कहार्ट कॉम्प्रेशन इंडिया, पुणे यांनी पुरवठा केला. सदर प्रेशर कॉम्प्रेसर मशीनमध्ये लागणारा क्रॅकशाफ्ट हा साताऱ्यातील कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. यांनी पुरविलेला आहे. ही सर्व मोहीम भारताची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोअंतर्गत यशस्वी करण्यात आली. कूपर कंपनीचे सर्व कर्मचारी ज्यांनी हा क्रँकशाफ्ट बनवला त्यांचेही उदयनराजे यांनी अभिनंदन केले.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
संबंधित बातम्या
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sun 27th Aug 2023 09:22 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 27th Aug 2023 09:22 pm










