खंडाळा तहसील कार्यालय सेतू विभागाबाबत लोक आयुक्त मुंबई व मंत्रालय या ठिकाणी निवेदन व तक्रार अर्ज दाखल !

मुंबई - खंडाळा तहसील कार्यालय सेतू विभाग यांच्यावर आजतागायत अनेक तक्रारी अर्ज निवेदने दाखल झालेली होती. या सर्व गोष्टींवर माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. सुनील कुमार बावधनकर यांनी सर्वात प्रथम खंडाळा नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी वाई तसेच जिल्हाधिकारी सातारा यांना समक्ष भेटून खंडाळा तहसील कार्यालय सेतू विभागातील भ्रष्ट कामकाजाबाबत अनेक तक्रारी अर्ज व निवेदने पुराव्यासह सादर केली होती. परंतु खंडाळा नायब तहसीलदार व तहसीलदार यांनी सदर प्रकरणाची कोणतीही दखल घेतली नव्हती व संबंधित सेतू ऑपरेटर यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

 

 

       यामुळे सर्वप्रथम श्री. सुनील कुमार बावधनकर यांनी दिनांक. ०१/०१/२०२४ रोजी समक्ष जिल्हाधिकारी साहेब सातारा यांना पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांचा सेतू खंडाळा बाबत कारवाई करण्याचा आदेश सादर केला होता. त्यानंतर दिनांक २४/०१/२०२४ रोजी श्री. सुनील कुमार बावधनकर यांनी समक्ष मुख्यमंत्री साहेब श्री. एकनाथ शिंदे यांना भेटून सदर तक्रारी अर्ज व खंडाळा तहसील कार्यालय सेतू यांच्या विरोधात सबळ पुरावे व निवेदन दिले होते. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः कारवाई करण्याचा जिल्हाधिकारी सातारा यांना आदेश दिला होता. मुख्यमंत्री साहेब यांनी आदेश देऊनही खंडाळा तहसीलदार यांनी सदर सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ, आदिनाथ देवकाते व खाजगी ऑपरेटर सुलतान शेख यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

        तरी खंडाळा तहसील कार्यालय सेतू ऑपरेटर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही व निवासी नायब तहसीलदार योगेश चंदनशिव यांनी सेतू ऑपरेटर यांना पाठीशी घालून खंडाळा तालुक्यातील जनतेची अमाप फसवणूक केली. म्हणून श्री. सुनील कुमार बावधनकर यांनी दिनांक २०/०२/२०२४ रोजी समक्ष लोक आयुक्त साहेब मुंबई व मुख्यमंत्री भवन मंत्रालय मुंबई येथे अर्ज व निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये असे सांगण्यात आले की जोपर्यंत खंडाळा तहसील कार्यालय सेतू विभागातील ऑपरेटर मुकेश सपकाळ, आदिनाथ देवकाते व खाजगी ऑपरेटर सुलतान शेख  यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नाही तसेच यांना भ्रष्टाचाराच्या लालचेपोटी पाठीशी घालत आलेले नायब तहसीलदार योगेश चंदनशिव यांची बढती व बदली यास अद्याप स्थगिती द्यावी व सदर दोषी घटकांवर कारवाई करावी असे सांगण्यात आले. 
        
        खंडाळा तहसील कार्यालय सेतू विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत लोक आयुक्त मुंबई यांनी लवकरच सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले आ

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त