इन्स्टाग्रामवरील मैत्री एका तरुणीला चांगलीच पडली महागात
Satara News Team
- Sat 30th Mar 2024 11:45 am
- बातमी शेयर करा
सातारा : इन्स्टाग्रामवरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणासोबत मैत्री केली, मैत्रीतून प्रेमसंबंध जुळले, त्यानंतर आरोपीने या तरुणीला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केला आहे. त्याने या घटनेचा एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओच्या माध्यमातून आरोपीने मुलीवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शिवा दत्तात्रय सुकासे आणि विकास प्रकाश सुकासे अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका वसतिगृहात राहत असताना पीडित मुलीची २०२२ मध्ये शिवा सुकासे याच्यासोबत मैत्री झाली होती. मैत्रीचा फायदा घेऊन या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर शहरातील एका लॉजवर अत्याचार करण्यात आला. त्याचा व्हिडोओ देखील बनवण्यात आला.
1 जानेवारी रोजी शिवाचा भाऊ विकास तिला पळवून घेऊन गेला. मुलीच्या कुटुंबाने तक्रार केली. ती मागे घेण्यासाठी शिवा आणि त्याचा भाऊ विकासने मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकला. शिवा आणि मुलीचा अश्लील व्हिडीओ त्यांना पाठवला. घाबरलेल्या कुटुंबाने यावेळी पोलिसांकडे तक्रार केली नाही.
मात्र, त्यानंतरही शिवाने सातत्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. त्रासाला कंटाळून अखेर मुलीने सातारा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 30th Mar 2024 11:45 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 30th Mar 2024 11:45 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 30th Mar 2024 11:45 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 30th Mar 2024 11:45 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 30th Mar 2024 11:45 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 30th Mar 2024 11:45 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 30th Mar 2024 11:45 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 30th Mar 2024 11:45 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 30th Mar 2024 11:45 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Sat 30th Mar 2024 11:45 am
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Sat 30th Mar 2024 11:45 am
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 30th Mar 2024 11:45 am
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Sat 30th Mar 2024 11:45 am













