श्रेय उदयनराजेंना जातं हे सांगताना त्यांना घशाशी येतं;खासदार शिवेंद्रराजेंवर भडकले

सातारा कास धरण  ते सातारा शहर या सुमारे २७ किलोमीटर लांबीच्या अतिरिक्त नवीन पाइपलाइनच्या ८७.२१ कोटींच्या प्रस्तावाला केंद्राच्या अमृत योजनेतून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. कासची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सर्व प्रथम आम्हीच दिला होता. याचे श्रेय उदयनराजेंना जाते हे सांगताना ज्यांना घशाशी येते आणि ज्यांना आमचे प्रस्ताव म्हणजे फोटोसेशन वाटते. त्यांना बसलेली ही मोठी चपराक आहे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा साधला.उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या सूचनेवरून या नवीन पाइपलाइनच्या कामाच्या प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्राने प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की कास धरणाची उंची वाढविल्यास, गुरुत्वाकर्षण पद्धतीने बिनखर्चाचे मुबलक पाणी सातारा शहराला मिळेल. यासाठी सर्वप्रथम कास धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रस्तावित केले. त्यानुसार या कामास वन विभाग, पर्यावरण विभाग, ग्रीन ट्रॅब्युनल अशा विविध विभागांच्या, तसेच युनेस्कोच्या मंजुरी मिळवण्यात आली. त्यानंतर कामास सुरुवात झाली. हे काम पूर्ण झाले आहे.
पूर्वीपेक्षा कास धरणाची पाण्याची साठवण क्षमता ०.५ टीएमसीने वाढली आहे. त्यामुळे चौपट पाणीसाठा वाढला आहे. सातारा शहराला मुबलक म्हणजे सुमारे ३५ एमएलडी पाणी दररोज उपलब्ध होण्याकरिता सध्याची पाइपलाइन शिवाय नवीन ८७.२१ कोटींचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये ९०० एमएम व्यासाची अतिरिक्त पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. आम्ही स्वत: या खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन प्रस्ताव त्वरित मंजूर करून घेतला आहे. नगरविकास मंत्रालयाने ८७.२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. अतिरिक्त‍ पाइपलाइनचे काम करताना कासचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही; पण आमचे प्रस्ताव म्हणजे फोटोसेशन अशी ओरड करणाऱ्यांना आता कोरड पडेल, अशी टीका करून आमच्या या रिझल्ट ओरिएंटेड कामांचा धसका संबंधितांना नक्कीच बसेल, असेही उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त