जनता तुम्हाला कायमचीच रस्त्यावर बसवणार मनोजदादा घोरपडे यांचा बाळासाहेब पाटील यांना टोला
Satara News Team
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : नलवडेवाडी ता. कोरेगाव येथे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्या प्रयत्नातून 18 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सभापती भीमरावकाका पाटील यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आला यावेळी मा.नगराध्यक्ष वासुदेव माने काका व संपतराव माने दादा गावचे सरपंच महादेवराव नलावडे पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम संचालक विक्रम बाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना मा. मनोजदादा म्हणाले विद्यमान आमदारानी पंचवीस वर्षे सत्ता भोगून आणि अडीच वर्ष मंत्रिपद भोगून सुद्धा त्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली असून कराड उत्तर मध्ये परिवर्तनाची योग्य वेळ आहे. कराड उत्तरची जनता यांना कायमच रस्त्यावर बसवल्या शिवाय राहणार नाही. परवा मसूर येथे यांनी केलेल आंदोलन म्हणजे केवळ दींखावा असून येणाऱ्या 22 तारखेला पाणी सोडले जाणार होते तसे नियोजन झाले होते परंतु केवळ प्रसिद्धीसाठी एक स्टंट म्हणून आंदोलन केले असून जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे परंतु यांच्या नौटंकीला जनता आता कंटाळली असून संपूर्ण मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लाट तयार झाली आहे या लाटेमध्ये विद्यमान आमदारांना कायमचच रस्त्यावर बसावं लागणार आहे.
यावेळी भीमरावकाका पाटील यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांचा जोरदार समाचार घेतला आणि ही योग्य वेळ आहे कराड उत्तर मध्ये एकास एक उमेदवार देऊन आमदारांना कायमच घरी बसवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना वासुदेवकाका म्हणाले मला काही या ठिकाणी कोणतीही निवडणूक लढायची नसून येणाऱ्या विधानसभेला कराड उत्तर मध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी लागेल तेव्हा वाटेल तेवढे प्रयत्न करून विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडून दिला जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री शंभूराजे देसाई , आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास निधी आणून विकासकामांचा बॅकलॉग भरून काढणार असून या बिन कामाच्या आमदारांना घरी बसवण्यास सर्वांनी कामाला लागावे.
यावेळी बोलताना विक्रमबाबा म्हणाले मा. धर्यशिलदादा यांच्या माध्यमातून व मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये कायमच विकासासाठी कार्यरत राहणार आहे. विद्यमान आमदार बीनकामाचे असून कोणतेही काम नसताना स्वतःहून नारळ फोडत आहेत तरी अशा या ढोंगी माणसापासून आपल्याला सावध राहावे लागणार आहे.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन राजूदादा नलवडे, प्रल्हाद जाधव, जगन्नाथ नलवडे, बाबुराव नलवडे महेश उबाळे, महीपती यादव, दिनकर नलवडे, गुलाब वाघ, प्रशांत निकम, सुरज चव्हाण, वाठार किरोलीचे सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .प्रास्ताविक प्रल्हाद जाधव सर यांनी केले तर आभार अण्णा धुमाळ यांनी मानले.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
संबंधित बातम्या
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Sun 20th Aug 2023 05:49 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Sun 20th Aug 2023 05:49 pm