वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा

कराड : आठ मार्च जागतिक महिला दिन औचित्य साधून कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथील महिलांनी निळेश्वर येथील मंदिरात स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्र शासनाच्या उमेद उपक्रमांतर्गत महिला सशक्तिकरण उपक्रम घेण्यात येत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योग व प्रशिक्षण, व बचत गट माध्यमातून महिलांमध्ये आर्थिक उन्नती व स्वयंरोजगार निर्मितीसाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे, अनेक ठिकाणी महिलांनी स्वतः उद्योगधंदे निर्माण केले आहेत याचा आदर्श घेऊन गावातील महिलांनी पुढाकार घ्यावा व बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योजिका बनण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी गावातील महिलांसाठी स्नेहभोजन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बचत गट समन्वयक गीतांजली जगदाळे यांनी यावेळी दिली आहे. 

 शेतीतज्ञ विशाल महाजन यांनी सेंद्रिय शेती व परसबाग याविषयी मेळाव्या दरम्यान माहिती दिली यावेळी महाजन म्हणाले सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. रासायनिक खताचा वापर शेतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होत आहे, त्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी आपण महिलांनी पुढाकार घेतला तर परसबाग उपक्रम यशस्वी होऊ शकतो आपल्या गावचे व आपले आरोग्य उत्तम राहू शकते. वडोली निळेश्वर गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून परस बाग हा उपक्रम सुरू केला आहे, परस बागेसाठी स्वतःची जागा देणाऱ्या स्वाती पवार ,कृषी सखी भारती पवार यांच्या पुढाकाराने परस बाग पक्रम यशस्वी झाला आहे त्याचेही कौतुक या प्रसंगी करण्यात आले महिला उमेद मेळावा दरम्यान महिलांच्या वतीने महिला सशक्तिकरण व सबळीकरण याचा नाश प्रसंगी देण्यात आला.

 यावेळी पंचायत समिती कृषी विभाग पूनम जाधव, ग्रामसेवक पुष्पा कोळी, सरपंच भीमराव मदने, उपसरपंच संभाजी पवार, अर्चना पवार, सुलोचना पवार, चेअरमन सुनील पवार, रवी जगदाळे, गणपत कुंभार, राणी चव्हाण, अर्चना इंगवले, गीतांजली जगदाळे, संगीता पवार यांची उपस्थिती होती. प्रस्ताविक सुशांत तोडकर आभार भारती पवार.यांनी व्यक्त केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त