राष्ट्रीय तंत्रशिक्षक पुरस्काराने डॉ विठ्ठल बांदल यांचा मा. धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते सन्मान .
बापू वाघ- Wed 7th Sep 2022 12:50 pm
- बातमी शेयर करा
वाई ; अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्यावतीने पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ- विठ्ठल बांदल यांना राष्ट्रीय तंत्र शिक्षक पुlरस्काराने केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री मा- धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे-
डॉ- बांदल हे मूळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली गावचे आहेत. लहानपणी अपघातात एक पाय निकामी होऊनही त्यांनी जिद्द बाळगून बामणोली, कुडाळ येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. इ. ११ वी., १२ वी. साठी वाईच्या जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात प्रवेश घेऊन तेथील वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. या दोन्ही वर्गात सर्वोच्च गुण मिळवून पुढे बी. एस्सी. भाग-१ शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. पुढे कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल विषयात एम. ई. ची पदवी घेतली तर आय. आय. टी., पवई येथून पीएच. डी. ची पदवी प्राप्त केली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झाले. कराड येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थीप्रिय शिक्षक व प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडलेले डॉ. बांदल सध्या पुणे येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत यशस्वी होत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरावा असाच आहे. या यशाबद्दल त्यांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदन भोसले यांनी अभिनंदन करून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. बांदल यांनी या कर्तबगारीने संस्थेचे व किसन वीर महाविद्यालयाचे नाव उज्वल केल्याचे सांगितले.
स्थानिक बातम्या
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 7th Sep 2022 12:50 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 7th Sep 2022 12:50 pm













