पाहा तुमचे भविष्य भाकीत पाहा कसा जाईल तुमचा दिवस.आजचा शुभ अशुभ मुहूर्त
Satara News Team
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
- बातमी शेयर करा

आजचा शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ५८ मिनिट ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३३ मिनिट ते ०३ वाजून २५ मिनिटांपर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ०२ मिनिट ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ४० मिनिट ते ०७ वाजून ०४ मिनिटांपर्यंत. त्रिपुष्कर योग सकाळी १० वाजून ४४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५५ मिनिटापर्यंत.
राहूकाळ दुपारी ०३ वाजून ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत. एकादशी तिथी सकाळी ०६ वाजून ०८ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ. आद्रा नक्षत्र १० वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर पुनर्वसू नक्षत्राची सुरुवात.
मेष
आज काहीतरी नवीन करून दाखविण्याची इच्छा निर्माण होईल. मात्र त्यावर योग्य नियोजन व त्यानुसार कृती करणे महत्त्वाचे असेल. काही प्रवासाचे योग संभवतात.
वृषभ
आज पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल. मात्र आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आजच्या दिवशी गरजेचे राहील तसेच आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावली जाणार नाहीत ना याचीही काळजी घ्यावी.
मिथुन
आज नाविन्यपूर्ण उत्साह, आनंद यांचा अनुभव घ्याल. एक नवीन उमेद, आशा, आकांक्षा आज निर्माण होतील व त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न कराल.
कर्क
आजचा दिवस काहीसा असमाधानकारक जाऊ शकतो. विनाकारण मरगळ आल्यासारखे वाटेल. निराशा, उदासीनता जाणवेल. त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ मनन, चिंतन करण्यात व्यतीत करावा.
सिंह
बरेच दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीची, परिश्रमाची शुभ फलिते आज आपणास प्राप्त होतील. व्यापार – व्यवसायात काही नवीन संधी प्राप्त होतील. आजच्या दिवसाचा योग्य उपयोग करा.
कन्या
आजच्या दिवशी शांतचित्ताने केवळ हाती घेतलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. आपल्या कामापासून लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार मंडळींना कामाचा काहीसा तणाव जाणवेल.
तुळ
आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम असेल. काही धार्मिक कार्यात दानधर्म कराल. विद्वान, गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त कराल. आजच्या दिवसाचा सदुपयोग करा.
वृश्चिक
आजच्या दिवशी काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. त्यामुळे मनस्वास्थ्य असमाधानकारक राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने चिडचिड, त्रागा संभवतो.
धनु
आज दाम्पत्य जीवनात समाधान लाभेल. दोघांमधील संबंध सलोख्याचे, सौख्याचे ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. सौख्याची प्राप्ती संभवते.
मकर
आजच्या दिवशी अती उत्साहात कामे पूर्ण करतांना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाळीव प्राण्यांपासून देखील सावध राहावे.
कुंभ
आजच्या दिवशी अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील. मात्र आपण उत्साहाने आपली सर्व कामे, कर्तव्ये पार पाडाल. कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल.
मीन
आज पारिवारिक सौख्य लाभेल. आज गृहसजावटीच्या काही वस्तूंची खरेदी संभवते. मालमत्तेसंबंधित काही व्यवहार आज पूर्ण कराल.
आजचा अशुभ मुहूर्त
राहूकाळ दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ०९ वाजून १० मिनिटापर्यंत यमगंड असेल. दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ सकाळी ०८ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजून २२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर मध्यरात्री ११ वाजून १८ मिनिटे ते १२ वाजून ०२ मिनिटांपर्यंत.
Rashibhavish
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Tue 23rd Aug 2022 02:03 am
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Tue 23rd Aug 2022 02:03 am