किसन वीर' ची एफआरपीची रक्कम वर्ग
बापू वाघ ( वाई )
- Sat 12th Nov 2022 10:18 am
- बातमी शेयर करा

सातारा न्यूज : भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खंडाळा कारखान्याची एफआरपीची राहिलेली रक्कम या अगोदरच वर्ग करण्यात आलेली होती. सन २०२१-२२ मध्ये किसन वीरकडे गळीताकरिता आलेल्या संपुर्ण ऊसाची एफआरपीची रक्कम येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करणार असल्याची ग्वाही कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी दिलेली होती. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांना दिलेल्या शब्दानुसार सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाची होणारी सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. एफआरपीची रक्कम वर्ग झाल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आमदार मकरंद आबा पाटील व व्यवस्थापनावर विश्वासार्हता निर्माण झालेली दिसून येत आहे. तरी ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला परिपक्तव झालेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे व संचालक मंडळाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sat 12th Nov 2022 10:18 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sat 12th Nov 2022 10:18 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sat 12th Nov 2022 10:18 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Sat 12th Nov 2022 10:18 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Sat 12th Nov 2022 10:18 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Sat 12th Nov 2022 10:18 am
संबंधित बातम्या
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Sat 12th Nov 2022 10:18 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Sat 12th Nov 2022 10:18 am
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sat 12th Nov 2022 10:18 am
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Sat 12th Nov 2022 10:18 am
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Sat 12th Nov 2022 10:18 am
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sat 12th Nov 2022 10:18 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Sat 12th Nov 2022 10:18 am
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Sat 12th Nov 2022 10:18 am